शिवसेनेच्या शिवसंवाद कार्यक्रमात राडा, आमदारावर खुर्ची भिरकावली..

शिवसेनेत प्रचंड गटबाजी सुरू झाली असून पक्षाची ताकद संपत आहे. आम्हाला कार्यक्रमाला बोलोवले जात नाही, असा आरोपही निकम व इतरांनी बैठकीत केला. (Shivsena Aurangabad)
Shivsena Aurangabad
Shivsena AurangabadSarkarnama

औरंगाबाद : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवसंवाद मोहिमेतच विसंवागाची थिणगी पडली. (Shivsena) वैजापूर तालुक्यातून आॅनलाईन सहभागी झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकी दरम्यानच राडा झाला. (Aurangabad)

तालु्क्यातील शिवसेना मुठभर लोक चालवतात, सामान्य पदाधिकारी, शिवसैनिकाला कार्यक्रमाला देखील बोलावले जात नाही, असा आरोप करत बाजार समितीचे सभापती संजय निकम यांनी थेट आमदार प्रा.रमेश बोरनारे यांनाच खुर्ची फेकून मारल्याचे समजते. (Marathwada) यामुळे एकच गोंधळ उडाला आणि दोन गट एकमेकांवर तुटून पडले, अखेर उपनगराध्यक्ष साबेर खान यांनी मध्यस्ती करत वाद मिटवला.

मात्र या निमित्ताने वैजापूर तालुक्यातील शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या संकल्पेतून शिवसंवाद मोहिम राबवण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवानिमित्त जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांशी आॅनलाईन पद्धतीने संवाद साधला जाणार आहे. या अंतर्गत आजच्या कार्यक्रमात वैजापूर तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी माजी तालुकाप्रमुख तथा विद्यमान बाजार समिती सभापती संजय निकम यांनी थेट आमदार बोरनारे यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतला. स्व.आर.एम.वाणी. यांच्या निधनानंतर शिवसेनेत प्रचंड गटबाजी सुरू झाली असून पक्षाची ताकद संपत आहे. आम्हाला कार्यक्रमाला बोलोवले जात नाही, असा आरोपही निकम व इतरांनी बैठकीत केला.

Shivsena Aurangabad
नववर्षाच्या शुभेच्छा अन् तिळगुळाने खैरे-दानवे यांच्यात गोडवा निर्माण होणार ?

तेव्हा दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, त्याचे पर्यावसन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यात आणि हाणामारीत झाले. निकम यांनी तर थेट आमदार बोरणारे यांनाच खुर्ची फेकून मारली. त्यामुळे वातावरण तापले, मोठा राडा होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपनगगराध्यक्ष साबेर खान यांनी धाव घेत निकम आणि इतर पदाधिकाऱ्यांना आवरले आणि त्यांना हाॅलच्या बाहेर घालवले. दरम्यान, शिवसंवाद मोहिमेतच हा प्रकार घटल्याने या संपुर्ण मोहिमेलाच गालबोट लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in