Gram Panchayat Election: पद्मसिंह पाटलांच्या तेरमध्ये तिरंगी लढत ; केजरीवालांची `आप`ही मैदानात..

Osmanabad News: एका पॅनलचा सरपंच पदाचा उमेदवारच अज्ञातवासात गेल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
Grampanchayat Election
Grampanchayat ElectionSarkarnama

Osmanabad District News : ग्रामपंचायतीमधील गावगाडा हाकण्यासाठी आता जोरदार पळापळ सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १६६ ग्रामपंचायतीचा आखाडा पेटला असून बहुतांश ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. (Grampanchayat Election) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीही रंगीत तालीम काही ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळत आहे.

Grampanchayat Election
NCP : शरद पवारांच्या समोरचं अजितदादांनी काढली बड्या नेत्यांची खरडपट्टी ; म्हणाले..

स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी बड्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. (Osmanabad) तुळजापूर तालुक्यातील सर्वाधिक ४८ उस्मानाबाद ४५ तर कळंब तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. (Marathwada) ज्येष्ठ नेते माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या तेर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे, गावात तिरंगी लढत होत आहे.

दरम्यान गावातील एका पॅनलचा सरपंच पदाचा उमेदवारच अज्ञातवासात गेल्याने उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे तिरंगीच्या ऐवजी दुरंगी सामना होण्याची शक्यता असून आम आदमी पक्ष या ठिकाणी खाते खोलतो का? याकडेही सर्वांची लक्ष असणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील येडशी, ढोकी, कसबे तडोळा, बेंबळी, तेर अशा प्रमुख गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.

तर कळंब तालुक्यातील मोहा, खामसवाडी, डिकसळ, शिराढोन अशा मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये लढती रंगल्या आहेत. त्यामुळे अशा मोठ्या गावावर राजकीय नेत्यांचेही लक्ष असून आपल्याच कार्यकर्त्याला गावात संधी मिळावी यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही गावांमध्ये एकाच पक्षाचे दोन गट आहेत.

त्यामुळे एका गटाला सहकार्य केले तर दुसरा गट नाराज होतो. आणि दुसऱ्याला सहकार्य केलं तर पहिला गट नाराज होतो. यामुळे जिल्ह्यातील नेते ग्रामपंचायत निवडणुकीत चांगली सावधानता बाळगत आहेत. 'तुम्ही लढा आम्ही बघतो' असं म्हणण्याची भूमिका काही नेत्यांनी घेतली असल्याने ग्रामीण भागात उलट सुलट चर्चा होत आहेत. तर स्वतःच्या मर्जीतल्या पुढाऱ्याला चांगली रसदही पुरवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com