Bjp : तीन दिवस, ६५ तास, तीन राष्ट्र, आठ नेते अन् २५ बैठका .. मोदींच्या विदेश दौऱ्याचे कौतुक

या दौऱ्यात त्यांनी अनिवासी भारतीयांच्या भेटीगाठी तर घेतल्याच पण रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या राष्ट्रांच्या अध्यक्षांचे मन वळवण्याचे देखिल त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते. (Bjp)
PM Narendra Modi-Raosaheb Danve
PM Narendra Modi-Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे नेहमीच चर्चेत असतात ते तिथे त्यांचे झालेले स्वागत, भाषण आणि होणाऱ्या गर्दीसाठी. (Bjp) कोरोना काळात मोदींचे विदेश दौरे पुर्णपणे बंद झाले होते. रशिया-युक्रेन युद्ध आणि त्यात मोदी सरकारने घेतलेली भूमिका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकत्याच केलेल्या विदेश दौऱ्याची चर्चा सध्या चांगलीच सुरू आहे.

भाजपकडून देखील या कमी वेळात अधिकाधिक नेत्यांच्या भेटी आणि झालेल्या बैठकांचा हवाला देत मोदींच्या दौऱ्याचे कौतुक होत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मोदींच्या या विदेश दौऱ्याचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून व्हायरल करत मोदींच्या वेगवान कामाचे कौतुक केले आहे. (Marathwada)

रावसाहेब दानवे यांनी मोदींच्या या दौऱ्याचे वर्णन करतांना ६५ तास, तीन दिवस, तीन राष्ट्र, ८ नेते आणि २५ बैठकांचा उल्लेख केला आहे. जर्मनी, डेन्मार्कसह अन्य देशांचा मोदी यांनी नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनिवासी भारतीयांच्या भेटीगाठी तर घेतल्याच पण रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या राष्ट्रांच्या अध्यक्षांचे मन वळवण्याचे देखिल त्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

PM Narendra Modi-Raosaheb Danve
Aurangabad : औरंगाबादकरांचे `पाणी` कोणाची सत्ता बुडवणार ?

एकंदरित मोदींच्या या दौऱ्याचे भाजपकडून कौतुक आणि मार्केटिंग देखील सुरू आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून मोदींच्या या विदेश दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कामाचा धडाका अधोरेखित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com