Chhatrapati Sambhaji Nagar : पत्नीशी भांडण झाल्याने विमानतळावर बॉम्बस्फोटाची दिली धमकी

या धमकीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Airport
Airport Sarkarnama

छत्रपती संभाजीनगर : पत्नीशी भांडण झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील एका रिक्षा चालकाने चक्क पोलिसांना (Police) फोन करून ‘विमानतळ (Airport) बॉम्बस्फोट करून उडवून देणार आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. मात्र, तपासात ही धमकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. धमकी देणारा कारभारी कडुबा रिठे या रिक्षाचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Threatened to blow up airport due to fight with wife)

नवरा-बायकोच्या भांडणात रुसवे-फुगवे, घर सोडून जाणे, अशा घटना आजपर्यंत आपण सर्वांनी पाहिल्या, ऐकल्या असतील. पण, छत्रपती संभाजीनगर शहराती एका रिक्षाचालकाने बायकोसोबत भांडण झाल्यामुळे विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याची खोटी माहिती पोलिसांना फोन करून दिली. त्यामुळे संभाजी नगरमधील पोलिसांची एकच धावपळ उडाली.

Airport
BJP NEWS : भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप : ‘हे तर ४० टक्के कमिशन एजंट...’ , प्रतिमेला मारले जोडे

आपण मांगिरबाबाच्या जत्रेला जात होतो. त्यावेळी गाडीतील चार व्यक्ती उद्या व परवा विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा करत होते, अशी माहिती देणारा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रिठे याने केला होता. त्याच्या या फोनमुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. यानंतर एमआयडीसी सिडको पोलिसांसह बीडीडीएसच्या पथकाने विमानतळावर धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केल्यानंतर काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. फोन लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, त्याने बायको सोबत भांडण झाल्यामुळे असा फोन केल्यास पोलिस अटक करतील; म्हणून चुकीची माहिती देणारा फोन केल्याचे सांगितले.

Airport
Karnataka Election : भाजपच्या आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला : नाराजांची संख्या वाढली

दरम्यान, कारभारी रिठे या रिक्षाचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सांगितले. एकंदरीतच विमानतळावर बॉम्बस्फोटाचा फोन आल्याने सर्व पोलिस यंत्रणा, एटीएस पथक, बीडीडीएस आदी सर्व पथके खडबडून जागी झाली असली तरी या फोनमुळे त्यांची चांगलीच धावपळ झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com