वीस वर्ष खासदार राहिलेले एकही काम सांगू शकणार नाहीत ; बागडेंचा खैरेंवर बाण

आमदार हरिभाऊ बागडे यांनी डाॅ. कराड यांचे कौतुक करतांना शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंवर चांगलेच तोंडसुख घेतले. (Mla Haribhu Bagde)
वीस वर्ष खासदार राहिलेले एकही काम सांगू शकणार नाहीत ; बागडेंचा खैरेंवर बाण
Haribhau Bagde-Chandrakant KhaireSarkarnama

औरंगाबाद : राज्यसभेवर खासदार आणि लगेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेल्या डाॅ. भागवत कराड यांनी दोन वर्षातच औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टाने पावले उचलली आहेत. (Bjp) पीएनजी गॅस पाईपलाईन हा प्रकल्प केवळ औरंगाबादच नाही तर मराठववाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे. कराड यांनी दोन वर्षातच अनेक विकासकामांना हात घातला, पण वीस वर्ष खासदार राहिलेले नेते एकही काम सांगू शकत नाही, अशा शब्दात भाजपचे आमदार माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर निशाणा साधला.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या अनुपस्थितीत पीएनजी गॅस प्रकल्पाचे भुमीपूजन केंद्रातील दोन राज्यमंत्री डाॅ. कराड आणि दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप वगळता इतर कुठल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार गैरहजर होते. व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली तेव्हा आमदार हरिभाऊ बागडे यांनी डाॅ. कराड यांचे कौतुक करतांना शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंवर चांगलेच तोंडसुख घेतले.

बागडे म्हणाले, आमच्या भागवत कराडांनी दोन वर्षात अनेक विकास योजना आणल्या, पण वीस वर्ष खासदार राहिलेल्या नेत्यांना मात्र एकही काम सांगता आले नाही. पाण्यासाठीची समांतर जलवाहिनी आणली पण ती त्यांनी अशी काही डोक्यावर घेतली की ती कधी खाली उतरलीच नाही. आजही औरंगाबादवासियांना पाण्यासाठी तरसावे लागत आहे.

Haribhau Bagde-Chandrakant Khaire
गॅस पाईपलाईन कार्यक्रमावर महाविकास आघाडीचा बहिष्कार; खासदारांचीही पाठ

पंतप्रधान आवास योजनेत ८० हजार लाभार्थ्यांनी अर्ज केले होते, ५२ हजार जणांचे अर्ज मंजुरही झाले पण घरकुलासाठी सरकारने जागाच दिली नाही. याला जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त जबाबदार नाही, कदाचित तुम्हाला तसे आदेश असतील. पण गोरगरिबांना हक्काचे घर मिळू द्या, असा टोला देखील बागडे यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in