बीडमध्ये वाद पेटला : `घरात पत्त्यांचे क्लब असणाऱ्यांनी आपली कातडी वाचवावी`

जिल्ह्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. परंतु जिल्ह्यातील विघ्नसंतोषी लोकांचे लक्ष मात्र आगामी निवडणुकांवर केंद्रित आहे. (Beed News)
Rajeshwar Chavan-Rajendra Mhaske
Rajeshwar Chavan-Rajendra MhaskeSarkarnama

बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर टिप्पण्णी (Beed Law and order) आणि पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के (Raje यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी टीका केली. (Beed) स्वतःच्या घराच्या जागेत पत्त्यांचा क्लब सापडल्याने जेलमध्ये जायची पाळी आली, देवस्थानच्या जमिनी बळकावल्याच्या तक्रारींचे व आरोपांचे वलय भाजप जिल्हाध्यक्ष व आणखी काही आजी - माजी भाजप (Bjp) नेत्यांच्या अवतीभोवती फिरत असल्याची टीका राष्ट्रवादीचे (Ncp) जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केली.

जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेला वठणीवर आणायला पालकमंत्री समर्थ आहेत, आपण आपली कातडी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा टोला देखील त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांना लगावला. दोन महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी शहराजवळील चऱ्हाटा फाटा परिसरातील हायप्रोफाईल पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला होता. या प्रकरणात आरोपींच्या यादीत भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचे नाव होते. हाच मुद्दा पुढे करत चव्हाण यांनी जिल्ह्यातील कायद व सुव्यस्था आणि पालकमंत्र्यांच्या कारभारावर टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर दिले.

परीक्षांद्वारे नोकरभरती मध्ये उघड झालेल्या घोटाळ्यात तर चक्क भाजपचे पदाधिकारी अटकेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकांमध्ये हाणामाऱ्या करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचे व्हीडिओ देखील अजून ताजेच आहेत. या परिस्थितीत कायदा व सुवतावस्थेबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नेत्यांनी वल्गना करणे निव्वळ हास्यास्पद आहे, मी स्वतः शिक्षणाने एक वकील आहे, कायदा व सुव्यवस्थेची मला संपूर्ण जाणीव आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी खंबीर आहेत. देवस्थान जमिनीच्या घोटाळ्यांची तर चर्चा आता राज्य स्तरावर देखील जाऊन पोहचली असून, त्यातील काही तक्रारींवरून भाजपच्या काही आजी माजी नेत्यांवर देखील चौकश्या लागल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील बँकांना सुरुंग लावून बँका, सहकार लुटून खाणाऱ्या समाजकंटकांना पालकमंत्री धनंजय मुंडे हेच कायद्याच्या कचाट्यात घेऊन वठणीवर आणतील, त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह त्यांच्या आजी माजी नेत्यांनी या चौकश्यामधून आपली कातडी कशी वाचवता येईल यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही देखील चव्हाण यांनी दिला.

Rajeshwar Chavan-Rajendra Mhaske
Latur : कुठूनही द्या, पण लातूरच्या पाण्याची व्यवस्था करा..

जिल्ह्यात धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे हाती घेतली आहेत. परंतु जिल्ह्यातील विघ्नसंतोषी लोकांचे लक्ष मात्र आगामी निवडणुकांवर केंद्रित आहे. खाकीच्या आडून आरोपांचे सोंग भाजप करत आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणे किंवा त्याच्या चौकशीची मागणी करणे आणि त्याआडून राजकारण साधत टीका करण्यासाठी जिल्ह्याची बदनामी करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, याचे भानही भाजपने ठेवावे, असेही राजेश्वर चव्हाण म्हणाले.

काय म्हणाले होते म्हस्के..

भ्रष्टाचार, घोटाळे आणि गैरव्यवहारात राज्यकर्ते मश्शगुल असून राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. विकासाच्या नावाने ठणठनाट असून कायदा व सुव्यवस्था कमालीची बिघडली. मंत्रिपद भूषवणारे मतदार संघापुरताच संकुचित विचार करतात. जिल्ह्याचा विचार केला तर, प्रगतिचा आलेख ढासळला. पालकमंत्री म्हणून राज्यकर्त्याने जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी कोणतेही भरीव काम अद्याप केलेले नाही.

जिल्हा प्रशासनावर जरब आणि धाक नाही. प्रत्येक विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. पोलिसांचा धाक नसल्याने सर्रास गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली. बिघडलेल्या कारभाराचे आणि सामान्य जनतेचे हालअपेष्टा आणि दु:ख पंकजा मुंडेंनी मांडले ते बदनामीसाठी नव्हे तर सामान्यांना न्याय देण्यासाठी. स्वत: कर्तव्यापासून परागंदा होऊन पालकमंत्री बदनामीची ढाल करून आपल्या निष्क्रियतेवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपला टार्गेट करण्यापेक्षा आपण राज्यकर्ते आहोत स्वहितापेक्षा लोकहिताला प्राधान्य दिले पाहिजे याचे भान तुम्हाला राहिलेले नाही. जिल्हा मागास आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने मान्य केले ,परंतु बीड जिल्हा बिहार झाला याची स्पष्ठ कबुली राज्याच्या सर्वोच्च सभागृहात राष्ट्रवादीच्या नेत्यानेच दिली. पंकजा मुंडे यांच्याकडे बदनामीचे बोट दाखवण्यापेक्षा आपल्या सहकारी आमदारांचे समाधान करण्यात निष्फळ ठरलात हे जिल्ह्यातील जनतेने उघड्या डोळ्याने पहिले, अशी टिका राजेंद्र मस्के यांनी नुकतीच केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com