
Aurangabad Political News : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना नडले होते. (Guardian Minister News) तालुकानिहाय निधी वाटपाची माहीती द्या, अशी मागणी डीपीडीसीच्या बैठकीत करत दानवे भुमरे यांच्यावर धावूनही गेले होते. यावरून मोठा वाद निर्माण होऊन डीपीडीसीच्या बैठकीत गदारोळ झाला होता.
कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनीही बैठकीत आपल्यावर सूड उगवला जात असल्याचा आरोप करत कागदपत्रे भिरकावली होती. (Aurangabad) त्यामुळे असमान निधी वाटपाचा मुद्दा राज्यभर गाजला होता. त्यानंतर हे प्रकरण मिटले असे वाटत होते, मात्र अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीकडून वाटप करण्यात आलेल्या निधी वाटपाची चौकशी करा, अशी मागणी राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांकडे केली आहे. (Shivsena) त्यामुळे जिल्ह्यातील असमान निधी वाटपाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
संभाजीनगर जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत जिल्ह्याच्या गाभा क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण ३२७.६६ कोटी निधीपैकी २४.१८ कोटी रुपये बिगर गाभा क्षेत्रासाठी वर्ग करण्यात आला आहे. (Marathwada) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी राज्य नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे देखील म्हटले आहे.
२३ ऑगस्ट रोजी अपर मुख्य सचिवांना या संदर्भात दानवे यांनी पत्र लिहून नियमबाह्यपणे वर्ग केलेल्या निधीचे पुनर्वियोजन रद्द करण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयाचे उल्लंघन झाले असून सदर बाब गंभीर असून सत्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी नियोजन विभागाच्या २५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयाचा हवाला देत केली आहे. राज्यातील ९० असे मतदारसंघ आहेत, ज्या ठिकाणी या सरकारने विकासनिधी दिलाच नाही. टक्केवारीत हे प्रमाण काढले तर राज्याचा ३३ टक्के भाग हा या सरकारने विकासापासून वंचित ठेवल्याचा आरोप दानवे यांनी केला होता.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.