Ashok Chavan On Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपाची चर्चाच झाली नाही...

Congress : माध्यामांनी दिलेल्या बातम्या या चुकीच्या आणि कुठलाही आधार न घेता दिल्या आहेत.
Ashok Chavan News, Maharashtra
Ashok Chavan News, MaharashtraSarkarnama

Maharashtra : कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेल्यानंतर इकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी काल झालेल्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली. कोणी किती जागा लढवायच्या हे देखील ठरल्याची चर्चा सुरु आहे.

Ashok Chavan News, Maharashtra
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : दंगल प्रकरणी नितेश राणे यांनी मातोश्रीवर केलेल्या आरोपांची एसआयटी चौकशी करा..

मात्र या सगळ्या चर्चा आणि माध्यमांवरील बातम्या या चुकीच्या, निराधार असल्याचे काॅंग्रसेचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपा संदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. (Congress) मग नेमकी या बैठकीत चर्चा झाली काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नसीम खान हे नेते उपस्थितीत होते. (Maharashtra) दोन तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवर चर्चा झाली. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या हे देखील ठरल्याचे वृत्त कालपासून माध्यमांनी दाखवले.

यावर आज अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर स्पष्टीकरण देतांना बैठकीत जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. माध्यामांनी दिलेल्या बातम्या या चुकीच्या आणि कुठलाही आधार न घेता दिल्या आहेत. बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती व इतर विषयांवर चर्चा झाली. परंतु बाहेर लोकसभा जागा वाटपात काॅंग्रेसला कमी जागा मिळणार वगैरे चर्चा रंगवण्यात आला. या चर्चेला कुठलाही आधारा नाही, मुळात बैठकीत जागा वाटपा संदर्भात कुठलीच चर्चा झालेली नाही. तो विषयच बैठकीत नव्हता, याचा पुनरुच्चार देखली चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com