मुंडे बंधु-भगिनी पुन्हा भिडणार; 2024 ची लिटमस टेस्ट

Pankaja Munde-Dhananjay Munde News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे कसे कमबॅक करतात याकडे लक्ष लागले आहे.
Pankaja Munde, Dhananjay Munde news
Pankaja Munde, Dhananjay Munde newsSarkarnama

Pankaja Munde-Dhananjay Munde News : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील खुद्द पंकजा मुंडे (Pankaja Munde) व त्यानंतर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विजय सोडले तर त्यानंतरच्या इतर निवडणुकांत परळी मतदार संघात भाजपची हारीकिरीच सुरु आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद-पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे कसे कमबॅक करतात याकडे लक्ष लागले आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या २०१४ मध्ये अकाली निधनानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. त्यांनी स्वत:चे नेतृत्व सिद्ध केल्याने राज्याच्या भाजपमध्ये त्यांना मानाचे पान मिळाले आणि जिल्हा भाजपचे (BJP) नेतृत्वही त्यांच्याकडेच आले. त्यांच्या नेतृत्वाखालील २०१४ च्या विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने घवघवित यश मिळविले. याच काळात झालेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकही एकहाती त्यांनी जिंकली.

Pankaja Munde, Dhananjay Munde news
Shivsena : भाजपसोबत जाऊन काहीच मिळाले नाही, मग कशासाठी केला अट्टाहास..

मात्र, यानंतर खुद्द मुंडे राज्यात मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना त्यांच्या होमपिचमधील परळी नगर पालिका निवडणूक आणि मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे परळी मतदार संघात पानिपत झाले. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (NCP) विजयाचे फटाके सुरुच होते. परळी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतही भाजपचा पराभवच झाला. ग्रामपंचायत व सेवा सहकारी सोसायटींच्या निवडणुकांतही राष्ट्रवादीच आघाडीवर होती.

विधानसभा निवडणुकीत खुद्द पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दरम्यान, आता जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यात परळी तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसह मतदार संघात असलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील २० हून अधिक ग्रामंपचायतींचा समावेश आहे.

Pankaja Munde, Dhananjay Munde news
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; रोहित पवारांनी घेतला समाचार

या निवडणुका जरी स्थानिक समिकरणांनुसार होत असल्या तरी या निवडणुकांत पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना नेतृत्वाकडून मिळणारे बळ महत्वाचे मानले जाते. यानंतर नगर पालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाही लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मतदार संघात कसे कमबॅक करतात आणि जिल्ह्यातील भाजपला विजयाची वाट कशी दाखवितात याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com