Shivsena : आंदोलनात कदमांचा फोटो गळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ; अन् कुत्रा भेदरला.

कदम यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक कुत्रा पकडून आणला. पण घोषणाबाजी आणि गर्दी पाहून कुत्रा भेदरला. ( Shivsena, Aurangabad)
Yuvasena Protest Agianst Ramdas Kadam News, Aurangabad
Yuvasena Protest Agianst Ramdas Kadam News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : ठाकरे कुटुंबियांवर रामदास कदम यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिक आक्रमक झाले. गुरूवारी (ता.२२) संतप्त शिवसैनिकांनी हडको टी. व्ही. सेंटर चौकात कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तिरडी हिसकावून घेतली. त्यानंतर (Yuvasena) युवासैनिकांनी कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकावून आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र कुत्रा भेदरल्याने केवळ रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

माजी मंत्री रामदास कदम यांनी ठाकरे कुटूंबियांविषयी आक्षेपहार्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ शिवसेना मध्य विभाग व युवा सेनेच्यावतीन आंदोलन करण्यात आले. (Aurangabad) हडको टी. व्ही. सेंटर चौकात कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिसांनी तो अयशस्वी केला. त्यामुळे कदम यांच्या फोटोला चपलांचा हार घालून आंदोलन करण्यात आले.

यावेळी या गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडक वर पाय, गद्दार रामदास कदम, हाय हाय या घोषणांनी परिसर दणाणून गेला. कदम यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक कुत्रा पकडून आणला. पण घोषणाबाजी आणि गर्दी पाहून कुत्रा भेदरला. त्याच्या विव्हळण्याच्या आवाजानंतर त्याला सोडून देण्यात आले.

Yuvasena Protest Agianst Ramdas Kadam News, Aurangabad
Jayant Patil : शरद पवार चमत्कार घडवू शकतात, हा लोकांना विश्वास..

नंतर युवासैनिकांनी रामदास कदम यांच्या फोटोला बुट, चपलाने मारून आंदोलन केले. युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, रामदास कदम यांनी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले असले तरी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कदम यांच्याविरोधातला रोष अधिकच वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in