Ambadas Danve News : खोके अन् दलबदलू मंडळी, एक थाली के चट्टे बट्टे...

Shivsena : सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सव विविध आरोप आणि चर्चांनी चांगलाच गाजला.
Ambadas Danve News, Aurangabad
Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

Marathwada : राज्यातील सत्तातंरानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षाकडून शिंदे गटासोबत गेलेल्या आमदार, खासदारांवर वारंवार टीका केली जाते. `पन्नास खोके एकदम ओक्के`, या घोषणेमुळे तर शिंदे गट हैराण झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena) शिवसेनेकडून संधी मिळेल तेव्हा मुख्यमंत्र्यांपासून मंत्रीमंडळातील मंत्री आणि आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला जातो.

Ambadas Danve News, Aurangabad
Vanchit Aghadi News: एमआयएमला सात महिन्यात सोडचिठ्ठी ; शिवसेनेशी आंबेडकरांची युती किती काळ टिकेल ?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला एकत्र जमलेल्या शिंदेगट, (Bjp)भाजप आणि एमआयएम खासदारांचा एकत्रित फोटो ट्विट करत जोरदार टाकी केली आहे. या फोटोमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार,व सहकार मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे व एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकमेकांच्या गळ्यात हात घालून उभे असतांना दिसत आहेत.

नेमक्या याचा फोटोचा वापर करत अंबादास दानवे यांनी खोचक ट्विट केले आहे. एक थाली के चट्टे बट्टे असे म्हणत सिल्लोड म्हणजे खोके आणि दलबदलू मंडळींची राजधानी असा टोला लगावला आहे. हा फोटो खास भाजपाई मंडळीसाठी असेही या ट्विटमध्ये नमूद केले आहे. सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सव विविध आरोप आणि चर्चांनी चांगलाच गाजला.

कृषी प्रदर्शन आणि अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटींच्या वसुलीचे टार्गेट कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप थेट हिवाळी अधिवेशनात करण्यात आला होता. त्यामुळे या कृषी महोत्सवाकडे शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनीच पाठ फिरवली. आता याच महोत्सवाताली मंत्री, खासदारांचा एकत्रित फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी सत्तारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in