
Chhatrapati Sambhajinagar : जी-२० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने मुक्तहस्ते केलेल्या खर्चाचे रंजक किस्से आता समोर येवू लागले आहेत. (G-20) विदेशी पाहुण्यांना शहराचे विद्रुपीकरण दिसू नये, यासाठी मुख्य रस्त्यावरील बराच भाग हा फ्लेक्स लावून झाकण्यात आला होता. विशेषतः ज्या मार्गावरून विदेशी पाहुणे मंडळी जाणार होती, तिथे हे फ्लेक्स महापालिकेच्या वतीने लावण्यात आले होते. त्यावर तब्बल १ कोटी १२ लाखांचा खर्च करण्यात आला होता.
व्हीआयपी रस्त्यांवर आजूबाजूला काही दिसू नये, यासाठी फ्लेक्स लावून रस्त्यांची बाजू झाकण्यात आली होती. (Municipal Corporation) विशेष म्हणजे अवघ्या पाच ते सहा दिवस मोजक्याच जागांवर हे फ्लेक्स लावले गेले होते. गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शहरात जी २० राष्ट्रसमूहाच्या सदस्य देशांची दोन दिवसीय बैठक पार पडली. (Marathwada) या बैठकीसाठी १९ देश आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधी शहरात आले होते.
त्यासाठी महापालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरण केले होते. हे पाहुणे ज्या दोन तीन प्रमुख मार्गांवरून ये जा करणार आहेत, त्या मार्गांवरच ही कामे करण्यात आली होती. याच मार्गांवर स्वागताचे डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले होते. राज्य सरकारने जी- २० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ५० कोटींचा निधी दिला होता.
महापालिका क्षेत्रात मूलभूत सोईसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत हा निधी दिला गेला होता. त्यातून रस्त्यालगतच्या उद्यानांचा विकास व सुशोभीकरण करणे, रस्ता दुभाजकामधील झाडांची छाटणी करणे, लागवड करणे, सुशोभीकरण करणे या कामांसाठी हा निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र स्वागतासाठी डिजिटल फ्लेक्सच्या नावाखाली १ कोटी १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
मे. ड्रिम्स क्रिएशन ॲडव्हर्टायझिंग या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले होते. या एजन्सीने अंदाजपत्रकीय दरापेक्षा १५ टक्के जादा दराने निविदा दाखल केली होती. महापालिका प्रशासकांनी नंतर एजन्सीसोबत दराबाबत वाटाघाटी केल्यानंतर या एजन्सीने निविदा दरात म्हणजे १ कोटी १२ लाख रुपयांत हे काम घेतल्याची माहिती समोर आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.