प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीला सख्ख्या भावानेच संपवले

सहा महिन्यापुर्वी किशोरी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तीने आळंदी येथे त्याच्यासोबत विवाह देखील केला होता. (Aurangabad District)
प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीला सख्ख्या भावानेच संपवले
Murder Sarkarnama

औरंगाबाद ः बहिणीने पळून जावून लग्न केल्याचा प्रचंड राग आलेल्या भावाने ती गावात पतीसह परत आल्याचे कळताच तिचे घर गाठले. (Aurangabad ) काही कळायच्या आतच त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. (Marathwada) विशेष म्हणजे हा हल्ला झाला तेव्हा त्याची आई देखील सोबत होती. (Murder) भावानेच बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याचे पाहून तिचा पती जीवमुठीत घेऊन पाळल्यामुळे वाचला.

सैराट चित्रपटातील शेवटच्या दृश्याची आठवण करून देणारा आणि अंगावर काटा आणणारा हा थरारक प्रसंग वैजापूर तालुक्यातील लाडगांव शिवारात घडला. बहिणीची हत्या करणारा अल्पवीन भाऊ आणि त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किशोरी मोटे असे मृत पावलेल्या विवाहीत तरुणीचे नाव आहे.

सहा महिन्यापुर्वी किशोरी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तीने आळंदी येथे त्याच्यासोबत विवाह देखील केला होता. मुलीच्या घरच्यांचा राग आता शांत झाला असेल असा विचार करून हे दोघे पती-पत्नी पुन्हा आपल्या गावी म्हणजेच लाडगांव शिवारात परतले होते. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतांनाच बहिण पुन्हा गावात आल्याचे समजताच तिचा भाऊ आणि आई तिला भेटायला म्हणून लाडगांव शिवारात आले होते.

Murder
पाच नगर पंचायतीत शिवसेनेची डरकाळी घुमणार?

बहिणीला पाहताच भावाचा राग अनावर झाला, पळून जाऊन लग्न का केले? असा जाब विचारतच त्याने सोबत आणलेल्या कोयत्याने बहिणीच्या गळ्यावर सपासप वार केले. यात बहिण जागेवरच गतप्राण झाली. तर तीचा पती जीव वाचवत पळून गेला.

विशेष म्हणजे हा प्रकार मुलीच्या आईसमोरच घडला. हा प्रकार समजताच शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी मयत विवाहित तरुणीच्या भावासह आईला अटक केली. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.