Sarpanch Agitation Thrown Money: पंचायत समितीपुढेच सरपंचाने उधळले लाखो रुपये; काय आहे नेमकं प्रकरण?

Phulambri Panchayat Samiti: पैसेवाल्याची कामे होतात, मग गरिबांना वाली कोण?
Sarpanch Agitation
Sarpanch AgitationSarkarnama

Chhatrapati SambhajiNagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीवर एका संरपंचाने पैसे उधळून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विहिरी व इतर प्रकरणे मंजूर करण्यासाठी गटविकास आधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे उधळत, हे पैसे घ्या आणि कमी पडले तर आणखी भीक मागून पैसे आणून देतो, असेही ते म्हणाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Sarpanch Agitation
Pune Crime: लई मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे..: गणेश बिडकरांना धमकी

फुलंब्री पंचायत समितीसमोर मंगेश साबळे (Mangesh Sabale) यांनी पैसे उधळत आंदोलन केले. ते गेवराई पायगा गावचे अपक्ष सरपंच आहेत. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांवर (BDO) गंभीर आरोप करत दोन लाख रुपयांची रोख रक्कम उधळली आहे.

साबळे म्हणाले की, "शेतकऱ्यांकडून जमा करून हे दोन लाख रुपये घेऊन आलेलो आहे. हे पैसे आम्ही या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मॅडम यांना देत आहे. त्यांना सांगतो हे पैसे तुम्ही घ्या आणि आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचा विहिरी मंजूर करून द्या!"

हे पैसे कमी पडले तर आणखी आणून देतो, असेही साबळेंनी सांगितले. ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर केल्या नाही तर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयाबाहेर आम्ही भीक मागू. शेतकऱ्यांसह तेथे आंदोलन करू. तेथून मिळालेल्या पैसे आणून तुम्हाला देऊ. आणखी चार लाख रुपये आणून देतो, पण विहिरींची प्रकरणे मंजूर करा."

Sarpanch Agitation
Ajit Pawar On Girish Bapat : "खरंतर बापटांना २०१४ मध्येच..." ; अजित पवारांनी सांगितली आठवण !

यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी बड्या नेत्यांचे ऐकून गरिबांची कामे टाळत असल्याचा आरोपही केला. साबळे म्हणाले, "मी अपक्ष सरपंच झालेलो आहे. मी पैसे वाटून सरपंच झालेलो नाही. त्यामुळे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे कसे मागू? तुम्ही एखाद्या सभापती, आमदाराचे ऐकून फक्त पैसेवाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैसेवाल्याचे गोठे करणार असाल तर मायबापहो गरिबांचे काम कोण करणार? गरिबाला वाली कोण? "

यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले. साबळे म्हणाले, "बारमध्ये नाचणाऱ्यांवर पैसे फेकले जातात तो बेवारस, काळा पैसा असतो. हा पैसा मात्र शेतकऱ्यांच्या कष्टाचा आहे. शेतकऱ्यांचा घामाचा आहे. शेतकऱ्यांच्या मुलीचे घरात लग्न आहे पण कापूस तसाच पडून आहे. शेतमालाला भाव नाही. मात्र हक्काच्या कामासाठी अधिकाऱ्यांना ४०, ५०, ६० हजार रुपये पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यावे लागतात. अधिकाऱ्यांना दीड लाख रुपये पगार आहे. त्यांना पेन्शन पाहिजे. आता विहिरी मंजूर करायचेही हे पैसे मागत आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com