सरकार कोणाचेही असो निधी आणण्याची ताकद माझ्या मनगटात

प्रहारला मत देवून काय फायदा ते विकासासाठी निधी कुठून आणणार? अशी टीका धनंजय मुंडे, अमित देशमुख यांनी आपल्या सभेतून केली होती. (State Minister Bacchu Kadu)
सरकार कोणाचेही असो निधी आणण्याची ताकद माझ्या मनगटात

Bacchu Kadu

Sarkarnama

चाकूरः राज्यमंत्री बच्चु कडू यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. (Bacchu Kadu) धनंजय मुंडे, अमित देशमुख यांनी केलेल्या टीकेला त्यांनी तडाखेबाज प्रत्युत्तर दिले. (Latur) सरकार कुणाचेही असो, निधी आणण्याची ताकद आपल्या मनगटात असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मराठवाड्यात (Marathwada) पहिल्यांदाच प्रहार जनशक्ती पक्षाचे पॅनल चाकूर नगरपंचायतीच्या निवडणुक आखाडयात उतरले आहे.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांनी चाकूर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव माकणे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे पॅनल उभे केले आहे. सर्व १३ जागेवर उमेदवार उभे करून त्यांच्या प्रचारार्थ मंत्री बच्चु कडू यांनी शहरात मोठी रॅली काढून सभा घेतली.

विदर्भातील आचलपुर विधानसभा मतदार संघातून चार वेळेस अपक्ष विजयी झालेले बच्चु कडू यांनी दिव्यांगांसाठी भरीव कार्य केलेल आहे. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदा मराठवाड्याच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. या भागातील मतदार फक्त बच्चु कडू यांचे नावच एैकुन होते, प्रत्यक्षात त्यांचे भाषण एैकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

भाषणातून त्यांनी सर्वच पक्षावर टिका केली. प्रहारला मत देवून काय फायदा ते विकासासाठी निधी कुठून आणणार? अशी टीका धनंजय मुंडे, अमित देशमुख यांनी आपल्या सभेतून केली होती. त्यालाही कडू यांनी उत्तर दिले. सत्तर वर्षापासून जात, धर्माच्या नावावर मत मागितली जात आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष विकासवर मत मागत असून तिरंगा हाच आमचा झेंडा आहे.

<div class="paragraphs"><p>Bacchu Kadu</p></div>
पंकजा मुंडेचा सूर बदललाः म्हणाल्या, फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा

आचलपुर मतदार संघात प्रशासन आपल्या दारी आणून जनतेची कामे आम्ही करीत आहोत, हाच पॅटर्न चाकूर शहरात राबविला जाणार आहे. वर्षातून एक दिवस पुर्ण वेळ चाकूर शहरातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, युवक, बचत गटांना रोजगार यासोबतच सत्ता कोणाचीही असो शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची ताकद आमच्यामध्ये असल्यामुळे सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.