एखाद्याला राजकारणातूनच नाही तर आयुष्यातून उठवायचं राजकारण सुरू आहे..

राज्याच्या राजकाणात आतापर्यंत असे कधी घडले नव्हते, हा नवा सुडाच्या राजकाणाचा पायंडा पाडला जात असून तो चुकीचा आणि घातक आहे. (Dhnanjay Munde)
Guardian Minister Dhnanjay Munde
Guardian Minister Dhnanjay MundeSarkarnama

बीड : एखाद्याला बदनाम करायचे, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करायचे आणि त्याला केवळ राजकारणातूनच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे राजकारण सध्या विरोधकांकडून सुरू आहे, असा आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी केला. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रातील भाजप (Bjp) असा संघर्ष सुरू आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करत महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सातत्याने ठाकरे सरकारकडून केला जात आहे. (Beed) अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राठोड हे तीन मंत्री ईडीची कारवाई आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना धनंजय मुंडे यांनी राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत, भाजपकडून एखाद्या व्यक्तीला राजकारणातूनच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे राजकाण सुरू असल्याची टीका केली. मुंडे म्हणाले, भाजपकडून अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले जात आहे. एखाद्याला राजकारणातून व वैयकित्त आयुष्यातून उठवण्यासाठी अगदी नियोजन पद्धतीने भाजपकडून राजकारण होत आहे.

राज्याच्या राजकाणात आतापर्यंत असे कधी घडले नव्हते, हा नवा सुडाच्या राजकाणाचा पायंडा पाडला जात असून तो चुकीचा आणि घातक आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आहे. त्यामुळे विरोधकांच्या राजकारणाला अधिकच धार येणार आहे. ते आक्रमक होऊन सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करतील.

Guardian Minister Dhnanjay Munde
काॅंग्रेसमध्ये तिकीटासाठी खूप कसरत करावी लागते, मला रात्री एक वाजता फोन आला होता..

सरकारच्या मंत्र्यांवर खोटे चुकीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सभागृहात विरोधकांनी केलेल्या हल्ल्याला आम्ही समर्थपणे उत्तर देऊ. विरोकांचे समाधान करतांनाच राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या अधिवेशनात कसे मार्गी लागतील याकडे देखील आमचे लक्ष असेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com