महाविकास आघाडीची कामगिरी जबरदस्त; वेगाने विकास साधण्यासाठी पाठीशी उभे राहा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचे दाखले देत खैरे मतदारांना आवाहन करत आहेत. ( Marathwada)
Chandrakant Khaire

Chandrakant Khaire

Sarkarnama

लातूर ः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कामगिरी जबरदस्त आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी देखील याचे कौतुक केले आहे. (Shivsena) न्यायालयांनी देखील सरकारच्या कामाला शाबसकी दिल्याचे समोर आले आहे. राज्यातील विकासाचा वेग दुपटीने वाढवायचा असेल तर स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे असेच उभे राहा, (Marathwada)असे आवाहन शिवेसना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

लातूर जिल्ह्यातील चाकूर, चापोली, जळकोट, उदगीर, देवणी, शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीच्या निवडणुक प्रचारासाठी खैरे जिल्ह्यात आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल सर्वत्र होत असलेल्या कौतुकाचा दाखला देत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

खैरे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार जबरदस्त कामगिरी करत आहे. यांचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय माध्यम व न्यायालयाने केलेल्या कौतुकातून समोर आला आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा वेग दुपटीने वाढवण्यासाठी असाच आशीर्वाद असू द्या.

तसेच नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा. लातूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी होतील, याबद्दल माझ्या मनात शंका नसल्याचेही खैरे म्हणाले. मराठवाड्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Chandrakant Khaire</p></div>
उर्जा मंत्र्यांच्या ताफ्यावर वीज बीले भिरकावत भाजपकडून घोषणाबाजी

लातूर जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर असल्याने त्यांनी या जिल्ह्याचा दौरा करून प्रचार सभांचा धडाका सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचे दाखले देत खैरे मतदारांना आवाहन करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com