कर्मचाऱ्यांना खात्री पटावी म्हणून आमदारांनी थेट परिवहन मंत्र्यांनाच फोन लावून दिला

(Mla Babasaheb Patil Ahmadpur) काही दिवसांवर दिवाळी सण आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही पाटील यांनी यावेळी केली.
कर्मचाऱ्यांना खात्री पटावी म्हणून आमदारांनी थेट परिवहन मंत्र्यांनाच फोन लावून दिला
Mla Babasaheb PatilSarkarnama

अहमदपूर ः राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागण्या, महागाई भत्ता, वेतनवाढ व अन्य मागण्यांसाठी हा संप होता. राज्य सरकारने एसटी कर्मचारी व संघटनांच्या काही मागण्या तात्काळ मान्य केल्या, तर काहींवर लवकरच सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे एसटीचा संप मागे घेण्यात आला. परंतु अद्यापही राज्यातील अनेक भागात संप आणि आंदोनल सुरूच आहे.

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बसस्थानकात एसटीचे शेकडो कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. राज्य पातळीवर झालेला निर्णय आणि त्यामुळे संप मागे घेण्यात आल्याची माहिती देत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे, परिवहन मंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य केल्याचे पाटील उपोषणकर्त्यांना सांगत होते.

परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा पाटील यांनी थेट परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनाच फोन लावला आणि उपोषणकर्त्यांचेच त्यांच्याशी बोलणे करून दिले. परिवहन मंत्र्यांच्या उत्तराने समाधान झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास शासनामध्ये विलीन करून घ्यावे या व इतर मागण्यांसाठी कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले होते.

त्यामुळे अहमदपूर डेपोतून एकही बस बाहेर गेली नाही. राज्यपातळीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आमदार बाबासाहेब पाटील हे उपोषणकर्त्यांच्या भेटीला गेले. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांचे थेट परिवहन मंत्र्यांशीच फोनवर बोलणे करून दिले.

Mla Babasaheb Patil
लातूर जिल्हा बॅंक प्रकरणात भाजपचा थेट मुख्यमंत्री कार्यालयावरच आरोप

यावेळी तुमच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवणे व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. काही दिवसांवर दिवाळी सण आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही पाटील यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.