सत्ता कोणाचीही असो, परळीशिवाय राज्यातील कोणतीच घडामोड घडत नाही : धनंजय मुंडे

कार्यकर्ते मंत्री असतांना म्हणायचे तुम्ही मंत्री आहात, पण आमचे काय? आता मी त्यांना म्हणतो जसं तुमचं तसंच माझं. (Mla Dhanajay Munde)
Ex. Minister Dhnanjay Munde, News Beed
Ex. Minister Dhnanjay Munde, News BeedSarkarnama

बीड : राज्यात सत्ता कोणाचीही असो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणीही होवो, आपल्या मतदारसंघाचा निधी कधीच थांबणार नाही. राज्यात होणारी कोणतीही घडामोड ही (Parali) परळीशिवाय घडत नाही ही आपली ताकद आहे, अशा शब्दात माजीमंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मंत्री नसल्याचा सर्वाधिक आनंद आपल्याला होतोय, आता संपुर्ण वेळ परळी मतदारसंघात राहता येते, असेही मुंडे म्हणाले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सत्तेतील सगळे मंत्री झटक्यात माजी झाले. (Marathwada) राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राहिलेले धनंजय मुंडे सध्या आपल्या परळी मतदारसंघात रमले आहेत. एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी आपण मंत्री नसल्याचा आनंद होत असल्याचे म्हटले आहे.

मंत्री असंताना आठवड्यातले चार दिवस मुंबईत राहावे लागायचे, बैठका घ्याव्या लागायच्या. मलाही फुटभर जमीनीवर चालावे लागायचे. कार्यकर्ते म्हणायचे तुम्ही मंत्री आहात पण आमचे काय? आता मी त्यांना म्हणतो जसं तुझं तसंच माझं, अशी मिश्किल टिपण्णी देखील मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे म्हणाले, मी मंत्री असलो काय किंवा नसलो काय? पण प्रभू वैद्यनाथाचा हात आपल्या डोक्यावर असा आहे, की आपल्या मतदारसंघातील विकासकामे आणि निधी कधी थांबत नाही. राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावर कोण आहे? याचा आपल्याला फरक पडत नाही. परळी मतदारसंघाची ताकद एवढी आहे, की राज्यात कोणतीच घडामोड ही आपल्याला विचारात घेतल्याशिवाय घडत नाही.

Ex. Minister Dhnanjay Munde, News Beed
धनुष्यबाणाची शपथ, एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही ; शिंदेना शेती करावी लागेल..

मंत्रीपद गेल्यामुळे अनेकजण चिंतेत आहेत, पण मंत्री नसल्याचा सर्वाधिक आनंद जर कोणाला झाला असेल तर तो मला झाला आहे. मंत्री असतांना मुंबईतच अडकून पडावे लागायचे. बैठका, दौरे यामुळे मतदारसंघात फार कमी राहायला मिळायचे. पण आता सगळा वेळ मतदारसंघासाठी देता येतोय याचा आनंद आहे.

कार्यकर्ते मंत्री असतांना म्हणायचे तुम्ही मंत्री आहात, पण आमचे काय? आता मी त्यांना म्हणतो जसं तुमचं तसंच माझं. मत्री असतांना जमीनीवर फूटभर चालायचो. पण आता त्याचीही गरज नाही, असेही मुंडे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in