Sanjay Shirsat On Court Decision : कायद्याची चौकट मोडली नाही, म्हणून चिन्ह, नाव मिळालं; निकालही आमच्या बाजूनेच..

Shivsena : आम्ही उठाव केला तेव्हा सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार केला होता.
Mla Sanjay Shirsat News
Mla Sanjay Shirsat NewsSarkarnama

Maharashtra : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल (Sanjay Shirsat On Court Decision) येणार आहे, आम्ही निश्चिंत आहोत, कारण आम्ही कुठलीही कायद्याची चौकट मोडलेली नाही. उठाव करतांना कायदेशीर सगळ्या बांजूचा आम्ही विचार केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा उद्या येणारा निकाल देखील आमच्या बाजूने असेल, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत बोलतांना व्यक्त केला. आमचा उठाव हा कायद्याच्या चौकटीत होता, म्हणूनच निवडणुक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूने लागला.

Mla Sanjay Shirsat News
Dharashiv Bjp News : नवा जिल्हाध्यक्ष राणा पाटलांच्या मर्जीतला, की ठाकूर गटाचा ?

धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव आम्हाला मिळालं, असा दावा देखील (Sanjay Shirsat) शिरसाट यांनी केला. राज्यात घडलेल्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. उद्या या निकालाचे वाचन होणार आहे, या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात उद्या काय उलथा-पालथ होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. (Shivsena) शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलतांना निकाल आमच्याच बाजूने लागणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

शिरसाट म्हणाले, उद्या येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष, त्यांचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. (supreme court) आमची बाजू भक्कम होती आणि आहे, त्यामुळे निकाल आमच्या बाजूनेच लागणार यावर मी आजही ठाम आहे. जेव्हा आम्ही उठाव केला तेव्हा सगळ्या कायदेशीर बाबींचा विचार केला होता. कोणत्याही परिस्थितीत कायद्याची चौकट मोडली जाणार नाही, याची काळजी आम्ही आणि आमच्या नेत्यांनी घेतली होती.

त्यामुळे निवडणूक आयोगाकडे जेव्हा पक्षाने नाव आणि चिन्ह कुणाला दिले पाहिजे, याचा वाद सुरू होता, त्यानंतर आलेला निकाल बरेच काही सांगून जाणारा होता. कायद्याच्या चौकटीत सगळ्या गोष्टी घडल्यामुळे ते तपासूनच निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव आम्हाला बहाल केले होते. त्यामुळे उद्या येणार निकाल हा देखील आमच्या बाजुनेच असेल. कारण आम्ही कायद्याच्या बाहेर जावून काहीही केलेले नाही, याचा पुनरुच्चार देखील शिरसाट यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com