Gangapur Sugar Factory : कारखाना जयहिंद शुगरच्या ताब्यात ; पाडव्याच्या मुहूर्तावर काम सुरू..

Marathwada : विरोधकांनी यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये असे, आव्हान संचालक कृष्णापाटील डोणगांवकर यांनी केले.
Gangapur Sugar Factory News, Aurangabad
Gangapur Sugar Factory News, AurangabadSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या आणि कर्जवसुलीसाठी राज्य सहकारी बॅंकेने ताब्यात घेतलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना (Gangapur Sugar Factory) अखेर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी बॅंक आणि सोलापूरच्या जयहिंद शुगरमध्ये काल (ता.२०) करार झाला असून त्याद्वारे गंगापूर कारखाना २५ वर्षाच्या भाडेतत्वावर जयहिंद शुगरला देण्यात आला आहे.

Gangapur Sugar Factory News, Aurangabad
Ambadas Danve News : महाराष्ट्र कामगार विधेयक कामगारांना गुलाम करणारे..

उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कारखाना सुरू करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक कृष्णापाटील डोणगांवकर यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत डोणगांवकर यांच्या (Shivsena) शिवशाही पॅनलने कारखाना ताब्यात घेतला होता. बंब यांचे संपुर्ण पॅनल पराभूत झाल्यानंतर हा कारखाना नवे संचालक मंडळ कधी सुरू करणार असा सवाल विरोधक आणि शेतकरी सभासद देखील विचारत होते.

तेव्हा डोणगांवकर यांनी गुढीपाडव्याला साखर कारखाना सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. गंगापूर कारखाना जयहिंद शुगरला भाडेतत्वावर देण्याचा करार काल झाल्यामुळे आता कारखाना प्रत्यक्षात सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात कारखाना सुरू होवून साखर उत्पादन्नाला काही महिने लागू शकतात. दरम्यान, राज्य सहकारी बॅंक आणि जयहिंद शुगरमध्ये करार झाल्यामुळे उद्यापासून कारखाना सुरू करण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.

विरोधकांनी यात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये असे, आव्हान संचालक कृष्णापाटील डोणगांवकर यांनी केले आहे. मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेला व सध्या राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना २५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालू करण्याबाबतचा राज्य बँक व जयहिंद शुगर सोलापूर यांच्यातील करार २० रोजी येथील रजिस्ट्री कार्यालयात पार पडला. त्यामुळे यावर्षी कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बंद असलेल्या कारखाना सुरू करण्याबाबत राज्य सहकारी बँकेने मागील सात-आठ महिन्यांपूर्वी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये सोलापूरच्या जयहिंद शुगरला कारखाना देण्याबाबत बँकेने सहमती दर्शवली होती. परंतु काही कारणाने कारखाना चालवण्याबाबतचा करार होत नसल्याने विलंब होत होता. मागील महिन्यातच गंगापूर सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. यात कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलचे २० संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले होते.

Gangapur Sugar Factory News, Aurangabad
Sanjay Raut : राहुल कुल यांच्यानंतर आता दादा भुसे राऊतांच्या निशाण्यावर : म्हणाले 'लवकरच स्फोट...'

त्यानंतर डोणगावकर यांनी पुढाकार घेऊन करार लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न केले. महिनाभरात बँकेसह, जयहिंद शुगर व संबंधितांशी वेळोवेळी बोलणी करून करार पूर्णत्वास नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. करार झाल्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास जयहिंद शुगरतर्फे सुष्मिता विखे पाटील यांनी राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून गंगापूर कारखान्याच्या मेन गेटवर जावून कारखान्याचा ताबा स्वीकारला.

उद्या, २२ रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारखान्याच्या कामाला सुरूवात करून येत्या हंगामात कारखाना सुरू करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. अतिशय परिश्रमाने गंगापूर सहकारी कारखाना सुरू करण्याचा करार पूर्णत्वास आला असून तालुक्यातील सर्व घटकांनी विनाव्यत्यय तो सुरू होण्यासाठी पुढील काळात सहकार्य करावे, कुणी आडवे येण्याचे पाप करू नये अशी विनंती कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com