Ajit Pawar:रेल्वे मार्गासह जिल्ह्यातील विकासाचा गाडा थांबणार नाही, सरकार पाठीशी

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही. (Ajit Pawar)
Ajit Pawar-Munde-Kshirsagar
Ajit Pawar-Munde-KshirsagarSarkarnama

बीड: राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कालावधीत आलेल्या कोरोना संकटामध्ये देखील राज्याचा विकासाचा गाडा थांबला नाही आणि थांबणार नाही याची काळजी घेतली गेली. (Beed) निधीची चणचण असूनही आरोग्य, रुग्णालय आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. (Ncp) विकास कामांसाठी येणारा पैसा हा जनतेचा असून यामधून होणारी कामे दर्जेदारच असली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बारकाईने काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन करतांनाच जिल्ह्यातील रेल्वे मार्गासह विकास कामांसाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडवासियांना दिला.

बीड येथे १०० कोटी ६० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते बीड येथे संपन्न झाले. पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पवार म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या आग्रही मागणीनुसार जिल्हा वार्षिक योजना, विकासाच्या अन्य योजना, आमदार निधी आदींमध्ये कोणतीही कपात केली नाही.

बीड जिल्ह्याच्या विकासाचा विचार करता, डीपीडीसी मधून ३६० कोटी रुपयास नुकतीच मंजुरी दिली, ऊसतोड मजुरांसाठी महामंडळ व त्यास २० कोटी भागभांडवल साठी तरतूद, वसतीग्रहासाठी निधीची तरतूद, नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा हिश्शाचा निम्मा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विकास निधी, आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद असा विविध योजनातून विकास निधी दिला गेला आहे.

केंद्र सरकार सारखे राज्यांना नोटा छापायचे अधिकार नसल्याने राज्याच्या उत्पन्नातू हा निधी दिला जातो. बीड शहरासाठी अमृत योजनेतून दोन पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यास पाण्याचे प्रश्न सुटू शकेल. परंतु नगरपरिषदेचे वीज बिल थकीत आहे. आर्थिक शिस्त देखील लागण्याची गरज आहे यावर उपाय काढण्यासाठी प्रशासक आणि बीडचे आमदार यांना सूचना केली आहे.

Ajit Pawar-Munde-Kshirsagar
औरंगाबादचे पुढील खासदार खैरेच, जिल्ह्यातील सर्व निवडणूकाही त्यांच्याच नेतृत्वात लढवू

कोरोना बरोबरच नैसर्गिक आपत्तीसाठी निधी दिला गेला आहे. जगात काही ठिकाणी कोरोना साथीची चौथी लाट देखील आली आहे. त्यामुळे आपण गाफील न राहता लसीकरण वेगाने पुर्ण करावे. बूस्टर डोस व विद्यार्थ्यांच्या लसीकरणात पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणा व उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com