थेट जनतेतून : 16 जिल्ह्यांतील 547 सरपंचांचा फैसला उद्या

Election : प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी 76 टक्के मतदान झाले.
grampanchyat Election News
grampanchyat Election NewsSarkarnama

मुंबई : राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत (Election) प्राथमिक अंदाजानुसार आज (ता.१८ सप्टेंबर) सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले आहे. (grampanchyat Election News)

grampanchyat Election News
'ते'स्क्रीनशॅाट अन् रेकॅार्डिंग सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधानही तोंड दाखवू शकणार नाही...

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले.

grampanchyat Election News
उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा...

दरम्यान, आज दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com