Maratha Reservation News : आरक्षणाचे स्वप्न घेऊन परतणाऱ्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ; कुटुंबाची जबाबदारी समाज घेणार..

Marathwada News : आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama

Manoj Jarange Rally : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काल अंतरवाली सराटी येथे झालेल्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार झालेल्या गेवराई येथील मराठा तरुणाचा घरी परततांना दुर्दैवी मृत्यू झाला. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाचे स्वप्न डोळ्यात साठवून घरी निघालेल्या विलास शिवाजीराव पवार यांचा वाटेतचं मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने मराठा समाजावर शोककळा पसरली. आज शोकाकुल वातावरणात विलास पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Maratha Reservation News
Maratha Reservation News : ट्रोल होताच हर्षवर्धन जाधव म्हणाले, जरांगेंना विरोध नाही..

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विलास पवार यांचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. (Maratha Reservation) पवार कुटूंबियांची भेट घेत जरांगे यांनी संपुर्ण मराठा समाज तुमच्या पाठीशी असून तुमची जबाबदारी आता समाजाची आहे. (Jalna) तो फक्त तुमचा मुलगा नसून माझा भाऊ होता. त्याच्या पश्चात कुटुंबाला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे.

या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही, असा धीर जरांगे यांनी पवार कुटुंबियांना दिला. (Maharashtra) मराठा आरक्षणाच्या लढाईत विलास पवार यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

विलास पवार यांच्या कुटूंबाला उघड्यावर पडू देणार नाही. सरकारला बोलून मदत करायला तर भाग पाडूच पण आज समाज एकत्र झाला असून समाजही या कुटुंबाला सर्वप्रकारची मदत करेल, असा शब्दही मनोज जरांगे यांनी यावेळी शोकाकुल समाज बांधवांना दिला. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजी पवार (३६) हे पायी गेले होते. सभा संपवून परत येतांना त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

विलास पवार हे शहागड येथून पायी सभेसाठी गेले होते. याठिकाणी त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी आपला छोटा भाऊ गणेश याला फोनवरून त्रास होत असल्याचे कळवले. यानंतर तातडीने विलास यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र गाड्यांच्या गर्दीने रुग्णालयात पोहचायला उशीर झाला आणि विलास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आज सकाळी अकरा वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत विलास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com