Municipal Corporation Aurangabad
Municipal Corporation AurangabadSarkarnama

Aurangabad : निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली, महापालिकेचा प्रारुप आराखडा रखडला..

पडेगाव, मिटमिटा, सातारा, देवळाईसह काही वॉर्डात लोकसंख्येची तफावत असल्याचे समोर आले. आयोगाने पाठवलेल्या लोकसंख्येचा आकडा दीड ते दोन हजारांनी जास्त आहे. (Municipal Corporation)

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे प्रारूप १७ मेपर्यंत तयार करून पाठविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाला दिले होते. पण प्रभाग रचनेच्या कामात लोकसंख्येचा घोळ निर्माण झाला आहे. हा घोळ संपविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) महापालिकेच्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. २६) अधिकारी मुंबईला जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. मात्र (Aurangabad)औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्पात होणार आहे. असे असले तरी आयोगाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार महापालिकेने १२६ वॉर्डांचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून सादर केला होता.

त्यात तीन वॉर्डांचा एक असे ४२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. दरम्यान आयोगाने प्रभाग रचनेचे प्रारूप १७ मे पर्यंत सादर करा असे आदेश महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना दिले. त्यासाठी आयोगाने शहराच्या नकाशासह कच्च्या आराखड्याचा तपशील महापालिकेला पाठवला, त्यासोबतच लोकसंख्येची माहिती देखील कळवली.

आयोगाने कळवलेल्या माहितीनुसार महापालिकेने प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला पण त्यात शहर परिसरातील पडेगाव, मिटमिटा, सातारा, देवळाईसह काही वॉर्डात लोकसंख्येची तफावत असल्याचे समोर आले. आयोगाने पाठवलेल्या लोकसंख्येचा आकडा दीड ते दोन हजारांनी जास्त आहे. या आकड्याची सांगड कशी घालावी, यासंदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागाने आयोगाकडून मार्गदर्शन मागविले होते.

Municipal Corporation Aurangabad
रेल्वे मंत्रालयातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांना दानवेंचा हिसका ; थेट बडतर्फच केले

दरम्यान आता आयोगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी मुंबईत बोलावले आहे. याविषयी निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे यांनी सांगितले की, लोकसंख्या आणि प्रभाग याची सांगड घालण्यासाठी आयोगाने गुरुवारी मुंबईत बोलावले आहे. त्यात तोडगा निघेल व प्रभाग रचना अंतिम होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com