Raosaheb Danve : घरातील कर्मचाऱ्याच्या मुलीला दानवेंनी घडवून आणली राष्ट्रपती मुर्मूंची भेट...

दानवेंच्या भोकरदन येथील बंगल्यात तीस वर्षापासून गरीब शेतकरी कुटुंबातला आत्माराम गव्हाणे हा काम करतो. (Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve and Family With President News
Minister Raosaheb Danve and Family With President NewsSarkarnama

नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या हरहु्न्नरी स्वभाव आणि धक्कादायक राजकारणासाठी ओळखले जातात. विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी डावपेच लढवण्यात तरबेज तितकेच मैत्री, संबंध जपण्यासाठी देखील ओळखले जातात. (president) गेली ३०-३५ वर्ष घरात काम करणाऱ्या आत्माराम नावाच्या कर्मचाऱ्याच्या मुलीला दानवेंनी आज थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घडवून आणली. यावेळी दानवे कुटुंबिय, त्यांची नात आणि आत्माराम यांची दहा वर्षाची मुलगी राजलक्ष्मी हीची देखील उपस्थिती होती.

संत श्री. ज्ञानेश्वर संस्थान, आळंदी विश्वस्त मंडळाने दानवे यांच्याकडे राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घडवून त्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीव समाधीच्या ७२५ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त स्मृती चिन्ह देण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Dehli) त्यानूसार दानवे यांनी राष्ट्रपती कार्यालयाकडे भेटीसाठी वेळ मागतिली होती. त्यानूसार (Raosaheb Danve) दानवे कुटुंब आणि देऊ-आळंदी संस्थानचे विश्वस्त यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची आज भेट घेतली.

रावसाहेब दानवे यांची नात युवराज्ञी आणि त्यांच्या घरात काम करणारे कर्मचारी आत्माराम गव्हाणे यांची मुलगी राजलक्ष्मी या देखील भेटीच्यावेळी सोबत होत्या. काही महिन्यांपुर्वी दानवे यांनी आपल्या एका वर्गमित्राला पुर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर सोबत नेले होते. अगदी त्या राज्यांच्या मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी देखील दानवेंनी आपल्या मित्राला सोबतच ठेवले होते. त्यामुळे दानवेंसोबत कुर्ता-पायजामा टोपी घातलेली ही व्हीआयपी व्यक्ती कोण? अशी चर्चा तेव्हा तिथल्या राजकीय वर्तुळात देखील झाली होती.

आज राजलक्ष्मी या घरकाम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीची राष्ट्रपती मुर्मूची भेट झाल्याच्या निमित्ताने तो प्रसंग देखील निश्चित आठवतो. ग्रापंचायतीत सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा राजकीय प्रवासात दानवे यांच्या बाबती अशा शेकडो घटना सांगता येतील, ज्यातून त्यांचा साधेपणा आणि तळागाळातील लोकांशी असलेला संपर्क अधोरेखित होतो.

Minister Raosaheb Danve and Family With President News
Reservation : उपोषण सोडवायला आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे..

दानवेंच्या भोकरदन येथील बंगल्यात तीस वर्षापासून गरीब शेतकरी कुटुंबातला आत्माराम गव्हाणे हा काम करतो. दानवे यांच्या व्यस्त दिनचर्येत त्यांची सर्व प्रकारची देखभाल, काळजी घेण्याची जबाबदारी आत्माराम यांच्यावर असते. त्यामुळे आत्मराम आता दानवे कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनला आहे.

त्यामुळे सहाजिकच आत्माराम आणि त्याच्या कुटुंबियाचे देखील दानवे कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. आमदार संतोष दानवे यांची कन्या युवराज्ञी आणि आत्माराम यांची मुलगी राजलक्ष्मी या दोघी देखील मैत्रीणी आहेत. त्यामुळे नातीला राष्ट्रपतींच्या भेटीला घेऊन जातांना रावसाहेब दानवे यांनी आवर्जून राजलक्ष्मीलाही सोबत नेले आणि तिलाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com