Shivsena : हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा ; उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबादेत स्तंभपूजन

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील पाणी प्रश्नावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. ती फोडण्यात उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी ठरणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Shivsena)
Shivsena, Aurangabad
Shivsena, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापनदिन येत्या ८ जून रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रचंड जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होत आहे. (Shivsena) आगामी महापालिका निवडणुका, १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली जाहीर सभा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मे रोजी काढलेला जल आक्रोश मोर्चा या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कुठल्याही परिस्थितीत ही सभा रेकाॅर्डब्रेकच झाली पाहिजे या दृष्टीने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. (Aurangabad) आज जाहीर सभेच्या व्यासपीठ व इतर कामांच्या उभारणीचा शुभारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते स्तंभपूजनाने करण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या माध्यमातून शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण तेव्हापासून राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. या शिवाय केंद्र विरुद्ध राज्य सरकार असे चित्र देखील पहायला मिळते.

भाजपकडून महाविकसा आघाडी सरकारने राज्याला अधोगतीकडे नेल्याचा आरोप केला जातो. मराठा, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास आघाडी सरकारला जबाबदार धरले जात असतांना आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतांना तिकडे केंद्राकडून देखील राज्याची कोंडी केली जात आहे. ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणाचा गैरवापर करून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्याचा प्रकार देखील गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

Shivsena, Aurangabad
Nanded : छप्पन दिवस, सात राज्यात तपास ; बियाणी हत्या प्रकरणात सहा आरोपींना बेड्या

तर दुसरीकडे मनसेला हाताशी धरून मशिदीवरील भोंग्या सारखे संवेदनशील विषय काढून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील विरोधकांकडून निर्माण केला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे विरोधकांच्या हल्याला कसे उत्तर देतात, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील पाणी प्रश्नावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. ती फोडण्यात उद्धव ठाकरेंची सभा यशस्वी ठरणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेसाठी ही सभा अत्ंयत महत्वाची असून ती यशस्वी करण्यासाठी शहर व जिल्ह्यात तब्बल पंधराशे बैठका घेण्यात आल्या. शिवसेनेचे नेते, पदाधिकारी सभेच्या नियोजनात झोकून देवून काम करत असल्याने ही सभा रेकाॅर्डब्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com