NCP : पिकेचं वाहून गेली, मग पंचनामे कशाचे करणार ? ओला दुष्काळ जाहीर करा..

अतिवृष्टीमुळे शेतीसाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. पावसाने हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. ( Ncp, Aurangabad)
Mla Satish Chavan Letter To Cm News, Aurangabad
Mla Satish Chavan Letter To Cm News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Mla Satish Chavan Letter To Cm News, Aurangabad
Beed : पंकजा मुंडेंना धक्का, पांगरी सोसायटीची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात..

परतीच्या पावसाने शेतातील पिकंच वाहून गेली, मग पंचनामे कशाचे करणार ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थितीत केला आहे. (Eknath Shinde) मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाडा सातत्याने अतिवृष्टीचा सामना करीत आहे. (Affected Farmers) यंदा देखील या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्याला बसला असून सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील १९ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात ६ लाख ७१ हजार ४२६ हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे तसेच मागील दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार ७३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खरिपाचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले असून यामध्ये कापूस, मका, सोयीबीन, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाने आदेश दिले असले तरी अद्यापही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार? अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गांमधून उपस्थित केला जात आहे.

अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतीसाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. पावसाने हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानपोटी सरसकट शेतकर्‍यांना आर्थिक मदत देत दिलासा द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in