kailas Gorantyal : तुम्हारा तो वक्त आया है, हमारा दौर आयेगा...

Marathwada : येत्या काळात खोतकर-गोरंट्याल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, Jalna
Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, JalnaSarkarnama

Jalna : काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे आपल्या शेरो शायरीसाठी प्रसिद्ध आहेत. अगदी विधीमंडळ अधिवेशनात देखील एखादा मुद्दा मांडतांना ते शायरीचा चपखल वापर करत विरोधकांवर टीकास्त्र सोडतात. सध्या (Jalna) जालना जिल्ह्याच्या राजकारणात शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जून खोतकर आणि विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यात जोरदार जुगलबंदी सुरू आहे.

Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, Jalna
Aurangabad : नामांतराच्या मुद्यावरून कोंडी, हर्षवर्धन जाधव आता कुणाचा गेम करणार ?

नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत करण्याचा खोतकरांचा आग्रह आहे, तर गोरंट्याल यांचा त्याला कडाडून विरोध आहे. (Marathwada) याशिवाय जालना सहकारी साखर कारखाना प्रकरणात खोतकरांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवरुन देखील संधी मिळेल तेव्हा गोरंट्याल टीका करत असतात. एका खाजगी कार्यक्रमात समर्थकांच्या आग्रहाखातर गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी एक शेर सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.

`खामोशी के बाद शोर आयेगा, तुम्हारा तो अभी वक्त आया है, हमारा दौर आयेगा`, असे म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान दिल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू आहे. गोरंट्याल आणि खोतकर हे तसे महाविद्यालयीन काळातील एकमेकांचे मित्र, परंतु राजकारणात वेगवेगळ्या पक्षातून प्रवास सुरू केल्यानंतर ते कट्टर शत्रू बनले आहेत. सध्या नगरपालिका की महापालिका यावरून या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.

गेल्या काही काळात गोरंट्याल यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी जवळीक वाढली होती. परंतु महापालिकेच्या मुद्यावर दानवे खोतकरांच्या बाजूने असल्याचे लक्षात आल्यावर गोरंट्याल आता भाजपपासून अंतर राखून असल्याचे बोलले जाते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्यामुळे जालना नगर परिषदेचे रुपांतर महापालिकेत केले जाण्याची शक्यता लक्षात घेता गोरंट्याल अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळते.

महापालिकेचा आग्रह धरणाऱ्या खोतकरांना अडचणीत आणण्यासाठीच काही दिवसांपुर्वी गोरट्यांल यांनी जालना कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांना सोबत घेत जिल्हाधिकारी आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची भेट घेतली होती. समृद्धीला जोडणाऱ्या नांदेड-हिंगोली मार्गासाठी संपादित होणाऱ्या जमीनीचा मोबदला ईडी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याची मागणी गोंरट्याल यांनी केली होती.

जेणेकरून खोतकर भागिदार असलेल्या कारखान्याला पर्यायाने खोतकरांना भूसंपादनाचे पैसे मिळू नयेत, असा प्रयत्न गोरंट्याल यांच्याकडून सुरू आहे. एकंदरित येत्या काळात खोतकर-गोरंट्याल यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. गोंरट्याल यांनी केलेल्या शायरीतून त्यांना हेच तर सूचित करायचे नाही ना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in