Sharad Pawar : कर्ज व्याज्यासह वेळेत परत केले तरच सहकार क्षेत्राला बळकटी येईल..

अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad PawarSarkarnama

नांदेड : सहकार चळवळीत महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. शंभर वर्षापासूनचा मोठा इतिहास आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. (Nanded) आता बॅंकांचे क्षेत्र वाढले असून सहकारी बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्थाकडे बघण्याचा रिझर्व्ह बॅंकेचा दृष्टीकोन अधिक चांगला असायला पाहिजे. नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच केंद्र सरकारमधील सर्वांनी विकासकामात सहकार्याची भूमिका ठेवली तर अपेक्षित विकास साधता येईल. सहकार क्षेत्र अधिक चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी सर्वांनीच व्यापक होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (ता १४) व्यक्त केले.

नांदेड शहरातील गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को - ऑप सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’मुख्यालयाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १४) सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. (Marathwada) त्यानंतर आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आॅनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी शरद पवारांनी सहकार क्षेत्रातील प्रगतीसाठी करावे लागणारे प्रयत्न याविषयी मार्गदर्शन केले.

पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात गोदावरी अर्बनने चांगल्या पद्धतीने काम करून नावलौकिक कमावला आहे. नांदेड ही पवित्र भूमी असून शिक्षण क्षेत्रात नाव झालेल्या एमजीएमची सुरूवात देखील नांदेडमधूनच झाली आहे. गोदावरी अर्बनने त्यांची ओळख महाराष्ट्रासह इतर राज्यातही निर्माण केली आहे. नांदेड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात शेतीमध्ये मिळणाऱ्या उत्पादनातून प्रक्रिया करणारे उद्योग या भागात यायला हवेत.

साखरेसह इतर उत्पादने साखर कारखान्यांनी सुरू केली त्याप्रमाणे आता सोयाबीन, हळद या पिकांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागृती करून याचेही उत्पादन व त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी चालना दिली पाहिजे. शेतकरी तसेच तरूण, महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

Ncp Leader Sharad Pawar
Aurangabad : मनसेचीही पाण्यासाठी संघर्ष यात्रा ; मुख्यमंत्र्यांना पाठवणार २५ हजार पत्र..

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची मदत होणार आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचबरोबर छोटे मोठे कर्ज घेणाऱ्यांनी देखील ते व्याजासह वेळेवर परत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर सहकार क्षेत्राला आणखी बळकटी येईल. धनंजय मुंडे यांनी गोदावरी अर्बनचा विस्तार महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि विशेष म्हणजे गुजरात राज्यात होतो, ही अभिमानास्पद बाब आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळकटी दिल्याबद्दल त्यांनी अध्यक्षा राजश्री पाटील यांचेही कौतुक केले.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आॅनलाईऩ भाषणातून उपस्थिती लावली. सहकारात विश्वासार्हता आणि नेतृत्व महत्वाचे असते आणि ते काम हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी गोदावरीच्या माध्यमातून केले असल्याचे सांगून गोदावरी अर्बनला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र ही सहकार क्षेत्राची मातृभूमी आहे. ग्रामिण आणि कृषीच्या माध्यमातून सहकार चळवळ अधिक वृद्धीगंत होईल. त्याचबरोबर रोजगार आणि विकासासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल, याचा विचार व्हायला हवा. नांदेडला देखील एक्सपोर्ट सेंटर भविष्यात होईल तसेच मराठवाड्यातही रस्त्याचे जाळे आणखी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, अर्जुन खोतकर, कमलकिशोर कदम, जयप्रकाश दांडेगावकर, भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधव किन्हाळकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर, संत बाबा बलविंदरसिंगजी, सुर्यकांत देसाई गुरूजी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर यांच्यासह आजी - माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com