Harshavardhan Jadhav On CM : मुख्यमंत्र्यांनी आधी शेतकऱ्यांची उधारी चुकती करावी, मगच कन्नमध्ये पाऊल ठेवावे...

Marathwada : मुख्यमंत्री कन्नडमध्ये कशाला येतायेत माहित नाही ? कदाचित पोकळ घोषणा करणार असतील ?
Harshavardhan Jadhav On CM
Harshavardhan Jadhav On CMSarkarnama

BRS News : अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. (Harshavardhan Jadhav On CM) त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कन्नडमध्ये येणार असल्याचे कळते. माझी त्यांना विनंती आहे, आधी शेतकऱ्यांची उधारी चुकवा, मगच कन्नडमध्ये पाऊल ठेवा, असे आवाहन बीआरएसचे मराठवाड्यातील नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे.

Harshavardhan Jadhav On CM
Nanded Congress News: अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा ; वाढदिवसानिमित्त पोस्टर...

नांदेड येथे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीरात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गावोगावी जावून समित्या स्थापन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपल्या (Kannad) कन्नड-सोयगांव मतदारसंघात सुरू केली आहे. नागरिकांना आवाहन करत असतांनाच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

जाधव म्हणाले, मुख्यमंत्री (Eknath Shinde) कन्नडमध्ये कशाला येतायेत माहित नाही ? कदाचित पोकळ घोषणा करणार असतील? पण माझे त्यांना एकच सांगणे आहे, शेतकऱ्यांना तुम्ही घोषित केलेली नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आधी शेतकऱ्यांची जी उधारी तुमच्याकडे बाकी आहे, ती चुकती करा अन् मगच कन्नडमध्ये पाऊल ठेवा, नुसत्या घोषणा करू नका.

राज्यातील शेतकरी आता त्रस्त झाला आहे, त्याला दिलासा देण्यासाठीच बीआरएस पक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकऱ्यांची सत्ता आणण्यासाठी कामाला लागला आहे. ज्यांना कुणाला मला आमदार करावंस वाटतं, त्यांनी गावोगावी स्थापन करण्यात येणाऱ्या नऊ समित्यांमध्ये आपापल्या क्षेत्रानुसार नाव नोदंणी करावी.

जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांसाठी चांगले काम करता येईल. येत्या महिन्याभरात मतदारसंघातील प्रत्येक गावात बीआरएसच्या वतीने समित्या स्थापन करण्याचे काम केले जाईल. केसीआर सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती देखील या दरम्यान गावागावत दिली जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com