मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यात पैठणसाठी दोन हजार कोटींचा निधी दिला, ठाकरेंनी काय दिले?

अडिच वर्षात त्यांनी पैठण मतदारसंघासाठी काय दिले ? मतदारसंघासाठी त्यांनी काहीच केले नाही, ते कुणालाही भेटले नाहीत, मग त्यांचा सत्कार कशासाठी करायचा. (Minister Sanipan Bhumre)
Cm Eknath Shinde-Aditya Thackeray-Bhumre News
Cm Eknath Shinde-Aditya Thackeray-Bhumre NewsSarkarnama

औरंगाबाद : मतदार संघात विकासकामांसाठी जे निधी देतात, जे लोकप्रिय असतात त्यांचाच जाहीर सत्कार होत असतो. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पैठण मतदारसंघासाठी अडिच वर्षात काय दिले, कोणती कामे केली असा सवाल करत रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

सोमवारी (ता.१२) पैठण (Paithan) येथील कावसानकर स्टेडियमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी भुमरे यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी पैठणच्या दौऱ्यावर येत आहेत, यावेळी पैठण येथे त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिंदे यांची जाहीर सभा देखील होणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी बिडकीन येथे येवून मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या निमित्याने त्याला भुमरेंकडून प्रत्युत्तर म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाते. भुमरे म्हणाले, आमची शक्ती आहेच, त्याचे प्रदर्शन करण्याची आम्हाला गरज नाही. आदित्य ठाकरे अडिच वर्षानंतर पैठण मतदारसंघात आले आणि ते दखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर. त्यावेळीही यायचे म्हणून ते येऊन गेले.

अडिच वर्षात त्यांनी पैठण मतदारसंघासाठी काय दिले ? मतदारसंघासाठी त्यांनी काहीच केले नाही, ते कुणालाही भेटले नाहीत, मग त्यांचा सत्कार कशासाठी करायचा. ज्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला, कामे केली त्यांचा जाहीर सत्कार केला जातो, म्हणून एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार सोमवारी केला जाणार आहे.

Cm Eknath Shinde-Aditya Thackeray-Bhumre News
Shivsena : आम्ही ओरिजनल, यायचं असेल तर ते पुढे येतील ; शिरसाटांसोबत उभे राहणे खैरेंनी टाळलेच..

शिंदे यांनी एक - दीड महिन्यात पैठण मतदारसंघासाठी दोन हजार कोटींचा निधी दिला असा उल्लेख भुमरे यांनी केला. ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी ८९० कोटी रुपये, वॉटरग्रीडसाठी ३८८ कोटी रुपये, पैठणच्या घाटासाठी वीस कोटी रुपये, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तीनशे कोटी रुपये, वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी चाळीस कोटी रुपये, नाट्यगृह आणि पैठण शहरातील सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र निधी एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे भुमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in