Eknath Shinde News : विरोधकांच्या टीकेनंतर सरकारला शहाणपण ? मुख्यमंत्र्यांनी 'पंचतारांकित' हॉटेलमधला मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलविला

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील शिंदे - फडणवीस- पवार सरकारने या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांसह, दोन उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रशासनाने कुठलीही कसर सोडलेली नाही. मात्र, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळ व अधिकारी हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावेळी आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम करणार होते.

पण मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या झळा यांचा मुद्दा पुढे करत विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला होता. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी आपला पंचतारांकित हॉटेलमधील मुक्काम शासकीय विश्रामगृहात हलविण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Congress Vs BJP : काँग्रेसच्या नेत्याने उधळली पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने; म्हणाले, 'ते कधीही भेदभाव...'

छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) शहरामध्ये शुक्रवारी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. मात्र, आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांची पंरपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारने मोडीत काढली आहे. आजवर झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचा मु्क्काम हा सुभेदारी या शासकीय विश्रामगृहात असत.

पण यावेळी एकनाथ शिंदे यांचा मुक्काम हजारो रुपयांचे दिवसाला भाडे असलेल्या अलिशान हॉटेलमध्ये असणार होता. यामुळे त्याची आता विरोधकांनी सत्ताधारी शिंदे- फडणवीस - पवार सरकारवर हल्लाबोल केला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासकीय विश्रामगृहात राहणार आहे.

मंत्रिमंडळाचा कसा आहे मुक्काम..?

आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात राहिला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रूम्स बुक करण्यात आले आहेत. रामा हॉटेलमधील एकूण ३० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री या काळात वास्तव्य करणार आहेत. तसेच, शहरातील ताज हॉटेलमध्ये ४० रूम बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्व सचिव वास्तव्य करणार आहेत.

'' हॉटेल बुकिंग माहीत नाही...''

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर भाष्य केलं. ते म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत नक्कीच चांगल्या घोषणा होतील. यापूर्वी आम्ही 2016 साली आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. त्यावेळी जे निर्णय घेतले. त्यातील अनेक कामे पूर्ण केली, काही पाईपलाईनमध्ये आहेत. जे बोलतात की, 2016 साली घेतलेल्या निर्णयाचं काय झालं? त्यांनी मागील अडीच वर्षात काय केलं ते सांगा असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Ganesh Festival 2023: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठं गिफ्ट; शिंदे सरकारने घेतला 'हा' निर्णय

याचवेळी त्यांनी मंत्रिमंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आलिशान हॉटेलमधील मुक्कामावर ते म्हणाले, हॉटेल बुकिंग माहीत नाही, आम्ही शासकीय विश्रामगृहात राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय...

उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, मी संभाजीनगरला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहोचणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसाठी लागणारा अधिकारी वर्ग संभाजीनगरला असणार आहे. तिथे मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय होतील. पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde News
Ajit Pawar Upset On Minister : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष; नाराज अजितदादांनी घेतला मोठा निर्णय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in