Bjp Vs Shinde Group : शिंदे गटातील नेत्याच्या बालेकिल्ल्यातच भाजप उपसणार आंदोलनाचं अस्त्र; 'हे' आहे कारण

Maharashtra Politics News: मागील आठवड्यातच आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजप आमने सामने....
bjp vs Balasahebanchi Shivsena
bjp vs Balasahebanchi ShivsenaSarkarnama

Abdul Sattar News : शिवसेनेतील बंडखोरी उफाळल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला.आणि उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळले. यानंतर राज्यात भाजप व शिंदे गट यांचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट संघर्ष सुरुच राहिला आहे.

मात्र, याचदरम्यान आता राज्यात सत्तेत एकत्र नांदत असताना स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदेगटातही वादाची ठिणगी पेट घेत असल्याचं समोर येत आहे. शिंदे गटातील नेत्याच्या बालेकिल्ल्यातच आता भाजपनं आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

bjp vs Balasahebanchi Shivsena
Sharad Pawar : सेवाग्रामच्या गांधी आश्रमात शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा !

शिंदे गटाचे नेते व सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते वादग्रस्त विधानं तर कधी गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहे. आता सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेत भाजप विरुद्ध शिंदे गट संघर्ष पेटला आहे. मागील आठवड्यातच ढोल बजाव आंदोलन केल्यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि प्रशासनाविरोधात भाजप रस्त्यावर उतरलं असून आज (दि.१३) एल्गार पुकारला सिल्लोड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सत्तार यांची चिंता वाढली आहे.

सिल्लोड (Sillod) नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या करवाढीविरोधात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रस्तावाविरोधात उपविभागीय अधिकारी यांना २६ जानेवारीला निवेदन देण्यात आलं होतं. प्रस्तावित करवाढ चुकीची असून बेकायदेशीर असल्याचाही आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी भाजपकडून मागील आठवड्यातच ढोल बजाव आंदोलनसुध्दा करण्यात आले होते.

bjp vs Balasahebanchi Shivsena
Assam Governor : राज्यपालपदी नियुक्ती होताच काही तासातच नव्या वादाला तोंड फुटलं ; RSS चे केलं तोंडभरुन कौतुक..

मात्र, त्यानंतरही सत्ताधारी व प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. याच धर्तीवर आता भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून आज सिल्लोड शहर बंदची हाक दिली आहे.

भाजप(Bjp)कडून प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात प्रस्तावित करवाढ ही चुकीच्या पद्धतीने लावलेली असून ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे असा आरोप केला आहे. तसेच करवाढीसाठी शहराचे चार झोन करण्यात आले असून, सर्वाधिक कर झोन क्रमांक एक मधील मालमत्तांना लावण्यात आल्याने सामान्य जनतेला वेठीस धरून मालमत्ता करवाढ करण्याचे षडयंत्र आहे असंही म्हटलं आहे. चुकीची कर आकारणीला विरोध करण्यासाठी भाजपच्या वतीने सिल्लोड बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

bjp vs Balasahebanchi Shivsena
Sharad Pawar : सत्ता लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आहे, याचा पंतप्रधानांना विसर पडला असावा !

मुख्यमंत्र्यांची सत्तारांवर विशेष मर्जी ?

सिल्लोड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वाढीव १२ कोटींचा निधी देत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी(Eknath Shinde) सत्तारांवरचे प्रेम व्यक्त केले आहे. सुतगिरणी, एमआयडीसी, पाणीपुरवठा योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून सत्तारांनी सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. नुकतीच सिल्लोड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासनाने सुधारित मान्यता दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com