Marathwada : चहाला नकार देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यास कृषीमंत्री म्हणाले, तुम दारू पिते क्या ?

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्यांची दिवाळी कडू झाली. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे. (Beed News)
Collector Radhabinod Sharma-Abdul Sattar Video News, Beed
Collector Radhabinod Sharma-Abdul Sattar Video News, BeedSarkarnama

बीड : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यातील एका संवादाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्तार गेले होते. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांसोबत चहा पितांना त्यांनी थेट तुम्ही दारू पिता का? असा प्रश्न विचारला.

Collector Radhabinod Sharma-Abdul Sattar Video News, Beed
Marathwada : शिंदे गटाचे नाही, तर काँग्रेस- राष्ट्रवादी- उद्धवसेनेचे आमदार फुटणार...

यावर काय उत्तर द्यावे, या विवंचनेत असलेले जिल्हाधिकारी निरुत्तर झाले. परंतु शेतकरी संकटात असतांना, त्यांच्या शेताचे झालेले नुकसान व मदतीवर चर्चा करणे अपेक्षित असतांना सत्तारांनी असंवेदनशीलपणा दाखवत दारूची चर्चा केली, (Beed) यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Abdul Sattar) काॅंग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी हा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्यांची दिवाळी कडू झाली. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे. दुसरीकडे राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे सांगत कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशातच गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतांना अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी चहा घेण्यास नकार दिला तेव्हा `तुम दारू पिते क्या`, अशी विचारणा केली.

यावर उपस्थितांनी हसत सत्तारांना दाद दिली, परंतु हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र सर्वसामान्यांमध्ये संताप पसरला आहे. यावरून विरोधकांनी आता सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून हा व्हिडिओ व्हायरल करत कृषीमंत्र्यांच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in