Bharat Jodo Yatra : हिंगोलीत यात्रा कॉंग्रेसची शक्ती प्रदर्शन ठाकरेंचे..

Bharat Jodo Yatra : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest news
Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest news Sarkarnama

हिंगोली : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर) सहभाग घेतला.‌ या यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करताच शिवसैनिकांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.

Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest news
राहुल गांधींनी आदित्य ठाकरेंना मिठी मारताच म्हणाले, बाबा कसे आहेत?

दरम्यान, शिंदे गटाचे हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदार संघातून यात्रा जात असताना शिवसेनेने (ठाकरे) शक्तिप्रदर्शन केले. माजी खासदार वानखेडे आणि कार्यकर्त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेपासून खांद्यावर भगवे झेंडे घेऊन चालायला सुरुवात केली.

यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरे यांनी यात्रेत चालण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदार संघातील रस्त्याची‌ निवड केली. त्यामुळे जणू ठाकरे गटाने बांगर यांना आव्हानच दिले, असे चित्र यावेळी निर्माण झाले होते.

Rahul Gandhi, Aditya Thackeray, Bharat Jodo Yatra Latest news
Bharat Jodo Yatra : हिंगोलीत येताच राहुल गांधींना आली राजीव सातवांची आठवणं; म्हणाले...

दरम्यान, शिवसैनिकांनी यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या अंगावर गुलाल टाकला. एकूणच आमदार बांगर यांच्या कळमनुरी मतदार संघात यात्रेनिमित्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com