Cm Eknath Shinde With Ramdas Kadam In Aurangabad News
Cm Eknath Shinde With Ramdas Kadam In Aurangabad NewsSarkarnama

ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या कदमांना मुख्यमंत्र्यांनी थेट बाजुच्या खुर्चीतच बसवले..

अडीच-तीन वर्षानंतर रामदास कदम औरंगाबादेत आणि तेव्हा पालकमंत्री म्हणून ज्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दालनात बैठका घेत होते, त्या सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले होते. (Ramdas Kadam)

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा चांगलाच चर्चेत येत आहे. वैजापूरहून दौरा अर्धवट सोडून ते काल रात्री थेट दिल्लीला गेले आणि सकाळी पुन्हा परतले आणि नियोजित कार्यक्रमांना हजर झाले. शिंदे यांच्या दौऱ्यातील एक वैशिष्ट म्हणजे (Shivsena) शिवसेनेतून नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले रामदास कदम (Ramdas Kadam) यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मानाचा वागणूक. कदम हे सध्या आमदार देखील नाहीत, पण शिवसेनेत सोबत काम केलेले, त्यांच्या ज्येष्ठतेचा आदर करत शिंदे यांनी चक्क शेजारच्या खुर्चीवर कदमांना जागा दिली.

विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसून कदमांनी बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे शिंदे यांच्या सरकारमध्ये रामदास कदम यांना मोठी जबाबदारी मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची तात्काळ हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना ठाकरे व शिवसेनेवर जो हल्ला चढवला त्याची व यावेळी ते भावूक होवून रडल्याचे चित्र संपुर्ण राज्याने पाहिले.

शरद पवार, अजित पवार, राष्ट्रवादी काॅंग्रेस, संजय राऊत, आदित्य ठाकरे या सगळ्यांचा समाचार कदम यांनी आपल्या खास शैलीत घेतला होता. तसेच आपण लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु त्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात कदम हजर झाले. रामदास कदम युती सरकारमध्ये जेव्हा राज्याचे पर्यावरण मंत्री म्हणून कार्यरत होते, त्याचवेळी ते औरंगाबादचे पालकमंत्री देखील होते. त्यामुळे रामदस कदम यांच्या कामाची पद्धत येथील प्रशासकीय यंत्रणेला चांगलीच परिचित आहे.

आज अडीच-तीन वर्षानंतर रामदास कदम पुन्हा औरंगाबादेत आणि तेव्हा पालकमंत्री म्हणून ज्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दालनात बैठका घेत होते, त्या सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसले होते. रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम हे शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले होते. तेव्हा रामदास कदम यांनी मात्र आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे जाहीर केले होते.

Cm Eknath Shinde With Ramdas Kadam In Aurangabad News
मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले, ईडी कारवाईच्या भितीपोटी कोणी येत असेल तर येऊ नका..

परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेतील इतर नेत्यांकडून मिळणारी वागणूक याला कंटाळून कदमांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कदमांनी शिवसेनेसाठी घेतलेले कष्ट व त्यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांचा योग्य मान-सन्मान राखला. आता नव्या सरकारमध्ये कदमांना काही जबाबदारी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com