Aurangabad : ठाकरे-शिंदे आज कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात; एसआरपी तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त..

शिंदे यांची सभा सुरू असतांनाच कदाचित आदित्य ठाकरे हे देखील शहरातील आंबेडकर चौकात शिवसैनिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. (Aditya Thackeray)
Aditya Thackeray-Shirkant Shinde News, Aurangabad
Aditya Thackeray-Shirkant Shinde News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे व शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे हे दोघे आज एकाचवेळी सिल्लोडमध्ये दाखल होत आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शिंदे जाहीर सभेसाठी तर ठाकरे हे शिवसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने आमने-सामने येत आहेत. या दोन्ही कार्यक्रमावरून मोठे राजकारण रंगले असतांना आता या दोन्ही नेत्यांच्या कार्यक्रमात कुठलाही राडा होवू नये यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले आहे.

Aditya Thackeray-Shirkant Shinde News, Aurangabad
Shivsena : कृषी मंत्र्यांना लाज नाही, ते राजकीय कार्यक्रम अन् दुसऱ्याची मजा उडवण्यात व्यस्त..

श्रीकांत शिंदे हे दुपारी चार वाजता सिल्लोडमध्ये दाखल होत आहेत, तर (Aditya Thackeray)आदित्य ठाकरे हे सायंकाळी सहा वाजता लिहाखेडी येथील शिवसंवाद मेळावा व शेतकऱ्यांच्या बांधावार जाऊन पाहणी आणि चर्चा करणार आहेत. (Abdul Sattar) या पार्श्वभूमीवर सिल्लोडमध्ये एसआरपीच्या तुकडीसह तब्बल पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून सिल्लोडमधील सभेची तयारी आणि इतर गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना आपल्या मतदासंघात येवून शिवसंवाद यात्रा व सभा घेवून दाखवा, असे आव्हान दिले होते. ठाकरेंनी ते स्वीकारत आज मेळावा घेण्याची घोषणा आठवडाभरापुर्वीच केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारांनी याच दिवशी खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा नगर परिषदेसमोरील मैदानावर आयोजित केली.

त्यामुळे सिल्लोडमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमात सभेऐवजी संवाद आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी असा बदल करण्यात आला. तरी देखील शिंदे यांची सभा सुरू असतांनाच कदाचित आदित्य ठाकरे हे देखील शहरातील आंबेडकर चौकात शिवसैनिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

हे पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेत पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनूसार सिल्लोडमध्ये एक एसआरपीची तुकडी तैनात करण्यात आली असून डीवायएसपी, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तब्बल पाचशे पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in