Thackeray : `रघुकुल रीत सदा चली आयी प्राण जाए पर वचन न जाई`, हे आमचे हिंदुत्व..

देशाच्या क्रिकेट संघाची बांधणी करतांना जसा विचार केला जातो, तोच सर्वोत्तम देण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार स्थापन करतांना करण्यात आला होता. (Aditya Thackeray)
Shivsena Leader Aditya Thackeray
Shivsena Leader Aditya ThackeraySarkarnama

नांदेड : देशाचा क्रिकेट संघ निवडतांना जसं प्रत्येक खेळाडूचे वैशिष्ट पाहून त्याला संघात घेतलं जातं. त्याच प्रमाणे महाराष्ट्राच्या सर्वोत्तम सेवेसाठी राज्यात (Shivsena) शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. (Nanded) भविष्यात देखील राज्याचा वेगवान विकास साधण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले.

नांदेडजवळ उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. (Marathwada) यावेळी आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वावरून टीका करणाऱ्या भाजपसह विरोधकांनाही टोला लगावला. `रघुकूल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये`, हेच आमचे हिंदुत्व असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार करत असलेल्या विकास कामांची माहिती देत खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहा, नवा महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न आपण वेगाने पुर्ण करू असे आश्वासन देखील यावेळी दिले. आदित्य ठाकरे म्हणाले, गेली दोन-अडीच वर्ष ही कोरोनामुळे वाया गेली, पण याही काळात आपण विकासकामांना कुठेही प्रेक लागू दिला नाही. रस्ते, पूल ही कामे सातत्याने सुरूच आहेत.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला निर्णय रायगडाच्या संवर्धनासाठी सहाशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले वचन पाळले आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. कोरोनामुळे त्याची प्रसिद्धी करता आली नाही, परंतु शेतकऱ्यांना दिलेले वचन आपण पाळले.

आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आपण ५० हजार रुपयांचे अनुदान देणार आहोत, अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास झाला पाहिजे हे धोरण घेऊन राज्यातील तीनही पक्षांचे नेते, मंत्री काम करत आहेत. एखादी योजना हाती घेतली की ती पुर्ण झाली पाहिजे, ती देखील वेळत याचालाच खरा विकास म्हणतात. नुसत्या घोषणा केलेल्या आणि रखडलेल्या योजनांना विकास म्हणता येत नाही.

Shivsena Leader Aditya Thackeray
Beed : वीस हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या परळीकरांचे समाधान हे माझे कर्तव्यच..

महाविकास आघाडी सरकारला वेगवान विकास साधायाचा आहे. देशाच्या क्रिकेट संघाची बांधणी करतांना जसा विचार केला जातो, तोच सर्वोत्तम देण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार स्थापन करतांना करण्यात आला होता, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

हे राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे मी राजकीय बोलणार नाही, जेव्हा राजकीय सभा होतील तेव्हा बोलेनच. पण सध्या काहीजण आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे, पण त्याची आम्हाला गरज नाही, असे सांगत रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये हेच आमचे हिंदुत्व असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in