
Parbhani Political News : मराठवाड्यासाठी आजचा दिवस राजकीय सुपर संडे ठरत आहे. परभणी मध्ये शासन आपल्या दारी, बीडमध्ये अजित पवार यांची उत्तर सभा तर हिंगोलीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा होत आहे. (Uddhav Thackeray Rally In Hingoli News) राज्याचे हे प्रमुख चार नेते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे शिवसेनेतील फुटीरांच्या विरोधात जाहीर टीका करताना दिसत आहेत.
तर त्यांना साथ देणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना देखील त टारगेट करताना दिसतात. त्यामुळे आजचा दौरा ठाकरे विरुद्ध एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातील सामना असणार आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये आज राजकीय युद्ध अटळ आहे. कारण शिवसेना फुटी नंतर पहिल्यांदाच (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे हे हिंगोलीत सभा घेणार आहेत.
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात ते दंड थोपाटतीलच पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना ते थेट अंगावरच घेतील. पण मराठवाड्याच्या दौऱ्यातच ठाकरे यांचा आवाज शांत करण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. त्यामुळे ठाकरेंच्या विरोधात तोफ डागण्यासाठी दारूगोळ्याची पुरेशी जमवाजमव त्यांनी केली आहे.
मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या सहा पैकी पाच आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हा डाग ठाकरे यांच्या जिव्हारी लागला आहे. ठाकरे हे या आमदारांच्या विरोधात तोफ डागण्याची शक्यता आहे. पक्ष फुटी नंतर उद्धव ठाकरे यांची पहिली सभा हिंगोलीत होणार आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवतील अशी देखील शक्यता आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी ठाकरे सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. हातातून निसटत असलेला मराठवाडा पुन्हा काबीज करण्यासाठी ठाकरे मैदानात उतरलेत. म्हणूनच त्यांची ही सभा ठाकरे गटाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची आहे. मराठवाडा जितका ठाकरे गटासाठी महत्त्वाचा आहे. तितकाच महत्त्वाचा प्रत्येक राजकीय पक्षांसाठी आहे.
आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. शिवसेनेतून फुटून आलेल्या आमदारांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करावेच लागेल. यासाठी मुख्यमंत्र्यांनाच जीवाचं रान करावं लागणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपांना करारी जवाब देण्यासाठीच एकनाथ शिंदे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाची बांधणी, पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं आव्हान शिंदे गटापुढे आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरे यांना कसे घेरता येईल, यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. त्यामुळे नांदेड ते परभणीचा एकाच हेलिकॉप्टर मधील प्रवास हा त्याच रणनीतीचा एक भाग असावा.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.