Chandrakant Khaire : राहुल शेवाळेंची अनेक लफडी, तर बांगर पत्याचा क्लब चालवतो..

Shivsena : राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
Chadrakant Khaire News, Aurangabad
Chadrakant Khaire News, AurangabadSarkarnama

Shivsena Reaction News : दिवगंत चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकणाने पुन्हा तोंड वर काढले आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असतांना शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळे यांनी काल लोकसभेत थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेत या प्रकरणाला हवा दिली. Shivsena त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

Chadrakant Khaire News, Aurangabad
शेवाळेंना चेंबूरहून अंधेरीला जाताना तीन तीन गाड्या का बदलाव्या लागतात? : युवा सेनेचा बोचरा सवाल

यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष भडकलेला असतांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राहूल शेवाळे हा लफडेबाज माणूस आहे, त्याची लफडी उद्धवसाहेबांनी मिटवली, असे म्हणत टीका केली आहे.(Chandrakant Khaire) तर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कानशीलात लगावली असती अशी भाषा वापरणारे शिंदे गटाचे (Santosh Bangar)आमदार संतोष बांगर यांच्यावर ते पत्याचा क्लब चालवून महिन्याला एक लाखांचा हप्ता वसुल करतात, असा गंभीर आरोप केला आहे.

सुशांतसिंग राजपूत, दिशा सॅलियान प्रकरणात युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यापासून हे प्रकरण चर्चेत होते. सीबीआयने या प्रकरणात क्लीन चीट दिल्यानंतर पुन्हा विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण पुन्हा उचलण्यात आल्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील राहुल शेवाळे कसे लफडेबाज आहेत, त्यांनी परदेशात केलेल्या भानगडींमुळे त्यांची बायको रडत उध्दव ठाकरे यांच्याकडे आली होती. उद्धव साहेबांनी ती भानगड मिटवली होती, असा दावा खैरे यांनी केला.

संजय राऊत यांच्यावर टीका करणारा संतोष बांगर हा पत्याचा क्लब चालवून महिन्याला एक लाखाचा हप्ता गोळा करतो, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला आम्ही सरळ करू, असा इशारा देखील खैरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया देतांना प्रसार माध्यमांशी बोलतांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com