ठाकरेंनी उमेदवारी दिली, तेच सांगतायेत राजीनामा द्या ; सत्तारांनी नाटक करू नये...

तुम्हाला उमेदवारी किंवा एबी फाॅर्म मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला नव्हता. तेव्हा गद्दार हे गद्दारच असतात त्यांच्यावर लागलेला हा डाग कधी निघू शकत नाही. ( Mla Ambadas Danve)
Abdul Sattar-Ambadas Danve News Aurangabad
Abdul Sattar-Ambadas Danve News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : अब्दुल सत्तार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बी फाॅर्म दिला होता. तेव्हा मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मी राजीनामा देईन, असे नाटक सत्तारांनी करू नये, असा टोला (Shivsena) शिवसेना आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच (Aurangabad)औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन आणि सिल्लोडमध्ये मेळावा घेण्यासाठी सत्तारांनी कंबर कसली आहे.

दरम्यान, शिवसंवाद मोहिमे दरम्यान, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना आमदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडून येवून दाखवा, असे आव्हान दिले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर आपण राजीनामा देवून निवडून येवून दाखवू, असे प्रति आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले.

यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी सत्तारांना सुनावले. प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षाने उमेदवारी दिली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या एबी फाॅर्मवर ते निवडूक लढले आणि निवडून आले. मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर आपण राजीनामा देवू आणि पुन्हा निवडून येवू ही भाषा आणि नाटक कशासाठी.

Abdul Sattar-Ambadas Danve News Aurangabad
मुख्यमंत्री म्हणाले, तुमचं कायं ते मिटवून टाका, अन् आम्ही एकमेकांना साखर भरवली..

तुम्हाला उमेदवारी किंवा एबी फाॅर्म मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला नव्हता. तेव्हा गद्दार हे गद्दारच असतात त्यांच्यावर लागलेला हा डाग कधी निघू शकत नाही. राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा आणि शक्तीप्रदर्शनाचा तर मुख्यमंत्री कोणीही असो त्यांचे स्वागत करण्याची परंपरा आहे, त्यात नवे असे काही नाही. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी जर तुम्हाला लोक आणावे लागत असतील तर ते तुमचे अपयश आहे.

शिवसेनेला अशा शक्तीप्रदर्शनाची गरज पडली नाही, पडणार नाही. आदित्य ठाकरे यांच्या शिसंवाद यात्रेत लोक आपणहून सहभागी झाले होते, त्यामुळे त्यांना सभा घ्याव्या लागल्या. सत्तार यांनी राजीनामा देवून निवडून यावे नाही तर पडावे, याच्याशी शिवसेनेला काहीही देणेघेणे नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in