अशोक चव्हाण सांगा, तुमचे अपयश लपवण्यासाठी नांदेडमधील दंगल प्रायोजित होती का?

(Bjp Leader Anil Bonde Blam Mahavikas Aghadi) राज्य सरकारचे अपयश, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या न्यासामध्ये झालेले घोटाळे या सगळ्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजीची दंगल घडवली का?
अशोक चव्हाण सांगा, तुमचे अपयश लपवण्यासाठी नांदेडमधील दंगल प्रायोजित होती का?
Ashok Chavan-Anil BondeSarkarnama

नांदेड ः राज्य सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे, या अपयशावर पांघरून घालण्यासाठी १२ नोव्हेंबरची दंगल तुम्ही भडकवली का? असा सवाल भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी नांदेडात येऊन महाविकास आघाडी सरकारला केला. का या दंगलीवर अशोक चव्हाण एक शब्दही बोलले नाही. ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले त्यांना भेटायला गेले नाही, शांततेचे आव्हान केले नाही? मग १२ तारखेची ही दंगल प्रायोजित होती का? असा माझा अशोक चव्हाण यांना सवाल असल्याचेही बोंडे म्हणाले.

राज्यातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध व त्यांनतर भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यावर गुन्हे दाखल करून सुरू असलेली धरपकड याच्या निषेधार्थ भाजपने नांदेडमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधा निदर्शने केली. माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेडात ही निदर्शने झाली, खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारने आपले अपयश झाकण्यासाठीच नांदेडात दंगल घडवल्याचा आरोप केला. राज्य सरकारचे अपयश, शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या न्यासामध्ये झालेले घोटाळे, परीक्षेसाठी दहा दहा लाख घेतले, नोकरीसाठी पंधरा लाख घेतले या सगळ्या प्रकरणावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजीची दंगल घडवली का? असा सवाल बोंडे यांनी उपस्थित केला.

Ashok Chavan-Anil Bonde
अमरावतीत बोंडेवरच गुन्हा दाखल आहे, त्यांनी नांदेडात येऊन शहाणपणा शिकवू नये

पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडमधील दंगलीबद्दल एक शब्दही बोलले नाही. या दंगलीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांची त्यांनी भेट घेतली नाही, कुणाला समजवायला देखील ते गेले नाही. त्यामुळे ही दंगल प्रायोजित होती का? असा माझा अशोक चव्हाणांना सवाल असल्याचे म्हणत बोंडे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे आपले अपयश झाकण्यासाठी दंगली सारखा दुसरा पर्यायच नसल्याचे म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in