Teachers Transfer Scam : बदली टाळण्यासाठी शिक्षकांची `शाळा`, सीईओंच्या दणक्याने ५२ जण निलंबित..

Marathwada News : चौकशीनंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.
Teachers Transfer Scam News, Aurangabad
Teachers Transfer Scam News, AurangabadSarkarnama

Beed News : सोयीच्या ठिकाणीच नोकरी करता यावी, बदली होवू नये म्हणून दिव्यांग असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या बीड जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना (Teacher) निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या धडक कारवाईने शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Teachers Transfer Scam News, Aurangabad
Sandipan Bhumre News : मुलाला, नातवाला जमले नाही, ते कडवट शिवसैनिकाने करून दाखवले..

सीईओ अजित पवारांनी केलेल्या चौकशीत जिल्ह्यातील २४८ पैकी ५२ शिक्षकांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. (Beed) त्यानंतर पवारांनी या ५२ शिक्षकांना निलंबित करत झटका दिला आहे. (Marathwada) शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकांची विभागीय चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

चौकशीनंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत. साडेतीनशे शिक्षकांची मेडिकल पथकाद्वारे तपासणी करण्यात आली होती. यामध्ये दोनशे शिक्षकांबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर या शिक्षकांना अंबेजोगाई वैद्यकी महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासणी केलेल्या शिक्षकांपैकी १४८ जणांचे अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते.

यात ५२ शिक्षक दोषी आढळून आले, विशेष म्हणजे हे सगळे शिक्षक खुल्या प्रवर्गातून नोकरीला लागल्याचे समजते. त्यानंत जिल्ह्यात सोयीच्या ठिकाणी नोकरी करता यावी यासाठी त्यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. बोगस अपंगत्वाच्या प्रमाणपत्रा आधारेच त्यांनी शासनाकडून वाहन खरेदी, आयकरात सुट असे लाभ देखील घेतले आहेत.

काही शिक्षकांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत, त्यानंतर निलंबितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीव्दारे होणार्‍या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पहिल्या टप्प्यात बदलीपात्र शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात १५७२ शिक्षक पात्र होते, पैकी ७९४ शिक्षकांनी आपण संवर्ग एकमध्ये बसल्याबाबतचे अर्ज केले. संवर्ग एकमध्ये गंभीर आजारी, दिव्यांग अशा बाबींचा समावेश आहे.

Teachers Transfer Scam News, Aurangabad
Sanjay Shirsat : बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे..

आपली बदली होवू नये किंवा हवी ती शाळा मिळावी, यासाठी शिक्षकांकडून बोगस कागदपत्रे जोडल्याचा संशय आणि तक्रारी आल्याने सीईओ अजित पवार यांनी संबंधित शिक्षकांची सुनावणी घेतली होती. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत व दिव्यांगत्वाच्या टक्केवारीबाबतच्या तपासणी दिव्यांग टक्केवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com