Marathwada Teachers Constituency : अजित पवार मैदानात ; विक्रम काळे ११ रोजी अर्ज दाखल करणार..

Ajit Pawar : हेच विक्रम काळेंच्या पाठीशी उभे राहणार म्हटल्यावर त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही.
Vikram Kale-Ajit Pawar News, Aurangabad
Vikram Kale-Ajit Pawar News, AurangabadSarkarnama

Aurangabad : मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर गेल्या २५ वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. विक्रम काळे हे सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. तर त्याआधी त्यांचे वडील दिवंगत वसंत काळे यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.(Vikram Kale) विक्रम काळे यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित असतांना अचानक त्यांना बदलण्याची मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रदीप सोळुंके यांनी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे केली होती.

Vikram Kale-Ajit Pawar News, Aurangabad
Old Pension scheme : शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांनी टाकला मोठा डाव; राजकीय पक्षांची केली कोंडी

त्यामुळे राष्ट्रवादी खरचं विक्रम काळे यांची उमेदवारी बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सोळुंके यांच्या भुमिकेमुळे विक्रम काळे यांना अंतर्गतविरोधातून फटका बसतो की काय? असे देखील बोलले जावू लागले. (Marathwada) परंतु विक्रम काळे यांच्या विरोधातील अंतर्गत विरोध मोडून काढण्यासाठी स्वतः अजित पवार (Ajit Pawar) मैदानात उतरणार आहेत. येत्या ११ जानेवारी रोजी विक्रम काळे हे अजित पवार यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

विक्रम काळे यांनीच ही माहिती दिली. आता अजित पवार हेच विक्रम काळेंच्या पाठीशी उभे राहणार म्हटल्यावर त्यांच्या उमेदवारीला कोणी विरोध करण्याचा प्रश्नच उरत नाही. ७ फेब्रुवारी रोजी मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेवून २९ डिसेंबर रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. त्यानूसार १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

१३ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. १६ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर ३० जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होवून २ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. 11 जानेवारी रोजी विद्यमान आमदार विक्रम काळे आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. विक्रम काळे यांची लढत भाजपच्या किरण पाटील यांच्याशी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in