Tanaji Sawant On Maratha Reservation : मराठा समाजाला कोणाच्या ताटतले नको, टिकावू आरक्षण हवे..

Maratha Reservation : काहीजण वेगवेगळ्या मागण्या पुढे करत मूळ मागणीला खिळ बसविण्याचे काम करत आहेत.
Tanaji Sawant on Maratha Reservation News
Tanaji Sawant on Maratha Reservation NewsSarkarnama

Marathwada : `देवेंद्र फडणवीस यांनी कळकळीने आणि डोके लावून मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले होते. त्यानंतर सरकार बदलले, त्या सरकराची भूमिका संशयास्पद होती. म्हणून सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठीही प्रयत्न केले गेले नाही. आता वेगवेगळे मागण्या करत मुळ आरक्षणाच्या मागणीला खिळ बसविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी केला.

Tanaji Sawant on Maratha Reservation News
Health Minister Tanaji Sawant News : आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल क्रमाकांचे राज्य करायचे आहे..

आम्हाला कोणाच्या ताटातले नको, तर पुर्वीचेच टिकणारे मराठा आरक्षण हवे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. (Aurangabad) औरंगाबाद येथे मराठा आरक्षणा संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. (Tanaji Sawant) मराठा समाजाला येत्या सहा महिन्यात टिकाऊ आरक्षण मिळाले पाहीजेत, हे आरक्षण कशातून द्यायचे हे शासन आणि न्यायालयाने ठरावावे.

मराठा आरक्षण हे तत्कालीन सरकाराने जाणून-बूजून घालवले. (Devendra Fadanvis) देवेंद्र फडणवीस यांनी कळकळीने हे आरक्षण दिले, ते टिकवले देखील. पण सरकार बदलले, त्यानंतर सुप्रीम कोर्टात तारखा असताना सरकारचा वकील हजर राहत नव्हता, याच गोष्टीमुळे आरक्षण गेले, असा आरोप सावंत यांनी केला. मराठा समाजाची देखील हीच भावना झाली आहे.

काहीजण वेगवेगळ्या मागण्या पुढे करत मूळ मागणीला खिळ बसविण्याचे काम करत आहेत. मात्र आम्हाला कोणाच्या ताटातले, वाटीतले काढून आरक्षण मिळावे, अशी आमची मागणी मुळीच नाही. तर पुर्वीचे फडणवीस यांनी दिलेले आरक्षण हवे आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा असणारे राज्य आहे. सर्वधर्म समभाव, बारा बलुत्तेदार हे राज्यात मराठा समाजासोबत हातात हात घालून नांदतात.

ही महाराष्ट्राची परंपरा आहे, या प्रकराला कुठतरी छेद देण्याची प्रयत्न काहीजण करत आहेत. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडा आणि पुर्वीचे टिकाऊ आरक्षण आम्हाला द्या, अशी आमची मागणी आहे.आगामी सरकारच्या वतीने सहा महिन्यात समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे, त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी मार्फत प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in