सत्तांतर झाल्यावर विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटलीये: तानाजी सावंतांची जीभ घसरली

Tanaji Sawant | आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

उस्मानाबाद : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीही गठीत केली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशातच मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर निशाना साधताना शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

आता सत्तांतर झाल्यावर लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली.

Tanaji Sawant
Attorney General |मुकूल रोहतगींनी धुडकावली केंद्र सरकारची अॅटर्नी जनरलपदाची ऑफर...

२०१४ ते १९ च्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर खुप आरोप झाले. ब्राह्मण म्हणून त्यांना हिणवलं. पण त्याच फडणवीसांनी २०१७-१८ मध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं, मराठा तरुणांना रोजगार मिळाले. पण २०१९ ला लोकांचा विश्वास घात करुन तुम्ही सत्तेत आलात, त्यानंतर सहा महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी तून आरक्षण द्या, पण याचा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहित असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात दोन वेळा मराठा आरक्षण गेलं, तरीही तुम्ही गप्प बसलात. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे, अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. पण सत्तांतर होताच तुम्हाला परत मराठा आरक्षणाची खाज सुटली, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला टिकाऊ आरक्षण मिळवून देतील, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बीडमध्ये बोलतानाही तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.  माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com