तानाजी सावंतांची जिभ घसरली; टीका करताना उद्धव ठाकरेंची लाज काढली...

गेल्या २० वर्षांपासून संसार मोडीत काढून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करत होतो, हे आता कळतंय. हे फक्त शिवसैनिकाचे रक्त सोसायचे काम करत होते. फक्त लेना बँक होती, त्यांना देणं माहीत नव्हतं.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama

बीड : गद्दार कोण..? आमचं तर सोडा, ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं. त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जहरी टीका केली. (Tanaji Sawant criticizes Shiv Sena chief Uddhav Thackeray)

हिंदू गर्वगर्जना संपर्क यात्रेच्या मेळाव्यात बीडमध्ये मंत्री सावंत बोलत होते. सावंत म्हणाले की, तुम्ही म्हणता माझ्या बापाचा फोटो लावायचा नाही. मग, माझ्या शिवबाचा फोटो लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे? महात्मा गांधी असतील, बाळासाहेब असतील, आनंद दिघे, तुळजाभवानी यांचे फोटो लावा आणि लावू नका म्हणण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? आज खऱ्या अर्थाने शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची बौद्धिक क्षमता काय हे कळलं. गेल्या २० वर्षांपासून संसार मोडीत काढून कुठल्या माणसाच्या हाताखाली काम करत होतो, हे आता कळतंय. हे फक्त सर्वसामान्य शिवसैनिकाचे रक्त सोसायचे काम करत होते. फक्त लेना बँक होती, त्यांना देणं माहीत नव्हतं.

Tanaji Sawant
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का : पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

आम्हाला परत डिवचाल तर ५० खोक्यांचा अर्थ काय असतो, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत सांगू शकतात. आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका. आम्हाला बोलू देऊ नका. तत्कालीन पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो, असे सावंत यांनी ठाकरे यांना सुनावले.

Tanaji Sawant
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल : पश्चिम महाराष्ट्रातील एका नेत्याचा समावेश होणार; शिंदे गटालाही संधी

विकास सोडला, हिंदुत्व सोडले, शिवसेना सोडली, शिवसैनिक रस्त्यावर सोडला आणि फक्त मुख्यमंत्री या एका पदासाठी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते एका शिवसैनिकला मुख्यमंत्री करणार होते. मग, अडीच वर्षांत खरा शिवसैनिक एकच आहे, ते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री, असं म्हणत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in