नांदेडच्या विकासकामांना स्थगिती; अशोक चव्हाणांचा नव्या सरकारला सल्ला

Nanded| Marathwada | महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला आहे. अनेक विकास कामे मार्गी लागली.
Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News
Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News

नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सरकार बनविण्यासाठी संधी घेतली. ती कशी घेतली, हे जगजाहीर आहे. त्यावर मी आता अधिकची प्रतिक्रिया देणे योग्य नाही. त्याबरोबर हे सरकार किती दिवस चालेल, याबाबत आत्ताच काही सांगणे उचित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह इतरही निर्णय काय होतात, हे पाहणेही महत्वाचे आहे. सध्या त्यांना शुभेच्छा. तसेच नांदेडच्या विकासकामांना गतीरोधक राहणार नाही, असेही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी गुरूवारी (७ जुलै) सांगितले.(Nanded Latest Marathi News)

नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होतो. यावेळी त्यांनी नांदेड जिल्हा, मराठवाडा व राज्यामध्ये केलेल्या विविध विकासकामांबद्दल माहिती दिली. जिल्हा नियोजन समिती व इतर कामे नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारने रद्द केली आहेत. हा कामे बंद झाल्याचा असुरी आनंद घेण्यापेक्षा विकास कामे व जिल्ह्याचा विकासाकडे लक्ष द्यावे, असा टोला अप्रत्यक्षरीत्या त्यांनी विरोधकांना लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नांदेड जिल्ह्याला भरघोस निधी मिळाला आहे. अनेक विकास कामे मार्गी लागली. पुढेही विकास कामाची गती अशीच सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Ashok chavan News in Marathi)

Ashok chavan News, Congress Party Latest News, Nanded News
राज्यपाल शिंदे-भाजप गटाला सत्तास्थापनेसाठी कसं आमंत्रित करु शकतात? शिवसेना पुन्हा न्यायालयात

मराठवाडा व नांदेड विकासापासून दूर होते, परंतु माझ्या मंत्री पदाच्या काळात खुंटलेल्या विकास कामाला गती मिळाली. मुख्यमंत्री असताना जेवढी कामे झाली नाहीत तेवढी गेल्या अडीच वर्षात झाली. जालना - नांदेड समृद्धी मार्ग पूर्ण होणार आहे. तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागले आहेत, याचा आनंद आहे. नांदेड शहरातील रस्त्याच्या विकास कामांसाठी शंभर कोटी रूपये महापालिकेकडे जमा आहेत. ५० कोटी जिल्हा प्रशासनाकडे आहेत. या कामांसाठी ही रक्कम वर्ग झालेली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे. सरकार पडले तरी नवीन सरकारकडून विकासकामे होणार आहेत, त्यामुळे नांदेडकरांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री डी.पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, प्रवक्ते संतोष पांडागळे, नगरसेवक मुन्तजीब, मारोतराव कवळे गुरूजी आदींची उपस्थिती होती.

आमदार कल्याणकर व्हावेत पालकमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे सहभागी झाले. त्यांनी शिंदे यांच्यासाठी मोठा त्याग केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्याग लक्षात घेऊन त्यांना नांदेडचे पालकमंत्री केल्यास चांगलेच होईल. आम्ही त्यांना मदत करू, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासकामांमध्ये झुकते माप दिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करणे योग्य

कॉँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून हिंदू - मुस्लीम असा भेदभाव करत नाही. इतिहास जाणून घेतल्यास औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केल्याची बाब इतिहासात नोंद आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये असताना त्या वेळेची परिस्थिती लक्षात घेऊन शहराचे नाव बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची भुमिका त्यावेळी योग्य आहे. यामध्ये हिंदु - मुस्लीम वाद होण्याचा विषय उद्भवत नाही. मी त्यावर जास्त भाष्य करून त्या वादात पडू इच्छित नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in