Sushma Andhare News : ''...यांच्यापासून माझ्या जीवाला धोका!''; बीडमधील घटनेनंतर अंधारेंचा खळबळजनक दावा

Shivsena Political News: ''एखादा माणूस ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर येऊन असं सांगत असेल तर निश्चित त्यांचा तसा काही प्लॅन असू शकतो...''
Sushma Andhare News
Sushma Andhare Newssarkarnama

Beed : बीडमधील महाप्रबोधन यात्रेआधीच ठाकरे गटात वाद चव्हाट्यावर आला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यांत वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पा जाधव यांनी अंधारेंना दोन चापट्या लगावल्याचा दावा सोशल मीडियावर स्वत:चा व्हिडीओ शेअर करत केला आहे.यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान आता सुषमा अंधारेंनी मोठं विधान केलं आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रा शनिवारी(दि.२०) होत आहे. याचवेळी ठाकरे गटातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. यानंतर आता आप्पासाहेब जाधवांच्या पैसे घेऊन पदं विकल्याचा आरोप, मारहाणीच्या दाव्यावर अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहेत.

Sushma Andhare News
Sushma Andhare News: ''अंधारे पैसे घेऊन पदं विकतात!''; ठाकरे गटातील 'या' नेत्याचा गंभीर आरोप

सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अंधारे म्हणाल्या, आत्तापर्यंतच्या महाप्रबोधन सभा वादळी झाल्या.त्यामुळे प्रबोधन यात्रा म्हटलं की, वाद, चर्चा आल्याच. ग्रामीण भागातल्या यात्रेतील ही समारोपीय सभेत खासदार संजय राऊत(Sanjay Raut) माझ्यासोबत असणार आहेत. यामुळे अनेकांना अस्वस्थ वाटतंय.

आम्ही स्टेजची पाहणी केली आणि त्यानंतर आम्ही परत आलो. त्यानंतर आप्पासाहेब जाधव काही गोष्टींवर बोलले. ते बऱ्यापैकी नाराज होते. या नाराजीचं कारण बॅनरवर फोटो नाही असं होतं. यावर मी त्यांना आपण बोलू असं सांगितलं. आमचे दुसरे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी इथं बोलायला नको, हॉटेलवर जाऊन बोलू असं सांगितलं.

Sushma Andhare News
Nitesh Rane : 'जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते' ; राणेंनी डिवचलं, उद्धव ठाकरेंही पदं विकतात..

त्यानंतर मी ठीक म्हणून गाडीत बसले. गाडीत मी फेसबूक लाईव्ह करून सभेच्या तयारीची माहिती देत होते. त्याचवेळी त्यांनी एका मुलाला काही कामं सांगितली. तेव्हा त्या मुलाने मी मजूर नाही, नीट बोला असं सांगितलं. यानंतर मी जिल्हाप्रमुख आहे, माझ्याशी असं बोलतो का, असशील तू जहागिरदार असं म्हणत शाब्दिक बाचाबाची वाढत गेली. त्याचं भांडणात रुपांतर झालं आणि मारामारी झाली.

एखादा माणूस ज्यावेळी कॅमेऱ्यासमोर येऊन असं सांगत असेल तर निश्चित त्यांचा तसा काही प्लॅन असू शकतो. पण मला कोणतीही मारहाण झालेली नाही. आणि जर तसं काही झालं असतं तर हे सगळं प्रकरण थांबलं असतं का ? पण हे सगळं जे आहे ते सभेला गालबोट लागावं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून सुरु आहे.काल ज्या आवेशात तो माणूस समोर येऊन बोलला. यावरुन शिंदे गटाची किंवा ज्या कुणाला शिवसेना पुन्हा उभी राहू नये असं वाटतं त्या लोकांकडून माझ्या जीवाला निश्चित धोका असल्याचं मोठं विधान अंधारेंनी केलं आहे.

Sushma Andhare News
Sameer wankhede News: वानखेडेंचा पाय खोलात; शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी खोलणार पत्ते ?

तसेच आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav)यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. बॅनरवर त्यांचा फोटो नसल्यानं जाधव हे नाराज होते.मला कुठलीही मारहाण झालेली नाही. महाप्रबोधन यात्रेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला गेला. मला जर पैसेच कमवायचे असते तर सत्ताधारी पक्षासोबत गेले असते असंही अंधारे म्हणाल्या.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आप्पासाहेब जाधव यांचा मारहाण झाल्याचा दावा फेटाळला आहे. त्या म्हणाल्या, मला कुठलीही मारहाण झालेली नाही. पण जर एखादा पदाधिकारी महिलेवर हात उचलल्याचं असं जाहीरपणे म्हणतो. त्याला आपल्यावर पोलीस केस होईल याची भीती वाटत नाही. याचा अर्थ या जिल्हाप्रमुखाला शिंदे गट आणि गृह मंत्रालयाकडून अभय आहे. त्यातूनच तो तसा बोलतोय असा आरोप अंधारे यांनी यावेळी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com